AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election : पाच मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, मतदानासाठी यंत्रणाही सज्ज

MLC Election : महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदानासाठी यंत्रणाही सज्ज झाली आहे.

MLC Election : पाच मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, मतदानासाठी यंत्रणाही सज्ज
mlc election Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 9:51 AM
Share

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या तीन पदवीधर , दोन शिक्षक मतदारसंघात निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. मतदान हे सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होईल. पाच जागांवर एकूण 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर , अमरावती आणि पुण्यात निवडणूक आहे. या निवडणुकीत 10 लाख 68 हजार 72 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात 41 उमेदवार आहेत. तर पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार आहेत. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात 38 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात 26 , पुणे विभागात 30 उमेदवार रिंगणार आहेत. पुणे विभागातील पदवीधरमतदारसंघात सर्वाधिक 47 उमेदवार रिंगणात आहेत.  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून ४१, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून ४७, तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून २६ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार आहेत.

नागपुरात मतदार यंत्रणा सज्ज 

नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी मतदान साहित्य वितरणासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. चोख पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्टीला मतदान साहित्य वितरण होणार आहे.  नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी एकूण 455 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 246 केंद्र नागपूर जिल्ह्यात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान पथक सज्ज होईल. यासाठी 2 हजार 535 अधिकारी,कर्मचाऱ्याची करण्यात आली नियुक्ती. याशिवाय केंद्र शासनाचे 476 अधिकारी आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे 32 अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले.

नागपुरात मतदान अन् मतमोजणी कधी?

या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.  नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात एकूण २ लाख ५५ हजार मतदारांची नोंदणी आहे.  यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष मतदार आणि १ लाख ८ हजार ३०१ महिला मतदाराचा समावेश आहे.

जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी:

– नागपूर जिल्हा – 144,466

– चंद्रपूर जिल्हा – 32,262

– गोंदिया जिल्हा – 22,176

– वर्धा जिल्हा – 21,742

– भंडारा जिल्हा – 21,349

– गडचिरोली जिल्हा – 13,106

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक, तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी मतदार

जिल्हानिहाय मतदान केंद्रे:

– नागपूर – 246

– चंद्रपूर  – 58

– वर्धा  – 41

– गोंदिया  – 39

– भंडारा  – 35

– गडचिरोली – 26

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?