AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election Candidate List : शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 जागांवर कोणाकोणात होणार लढत? वाचा Full List

राज्यातील 5 विधान परिषदेच्या जागांसाठी 23 तारखेला मतदान होणार असून प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत, 27 तारखेला याची मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेली आहे.

Maharashtra MLC Election Candidate List : शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 जागांवर कोणाकोणात होणार लढत? वाचा Full List
maharashtra mlc election 2026 candidate full listImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 6:52 PM
Share

 संदीप जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्यात सध्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची धूम आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आता या पाचही मतदारसंघांमध्ये नेमकी कोणाकोणामध्ये लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. काही मतदारसंघामध्ये बंडखोरीदेखील झालेली आहे. त्यामुळे आता मतफुटीची शक्यता लक्षात घेऊन उमेदवारांना विजयाचे गणित साधावे लागणार आहे. त्यामुळेच या पाच मतदारसंघांमध्ये कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार आहेत? कोणामध्ये लढत होणार? हे सविस्तरपणे जाणून घेऊ या…

विधान परिषद निवडणूक 2026

1) पुणे शिक्षक मतदार संघ -एकूण मतदार- 64000

कोणाकोणामध्ये होणार लढत?

कौस्तुभ गावडे-भाजपा विरुद्ध जयंत आसगावकर-काँग्रेस सचिन सानप-शिवसेना , दत्तात्रय सावंत-अपक्ष

2) पुणे पदविधर मतदार संघ -एकूण मतदार- 388000

कोणाकोणामध्ये होणार लढत?

स्मिता जाधव-भाजप विरुद्ध हर्षदा देशमुख-जाधव- राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

सुनिल मोदी-ठाकरे गट

3) नागपूर पदविधर मतदार संघ- एकूण मतदार-258637

कोणाकोणामध्ये होणार लढत?

सुधाकर कोहळे -भाजप विरुद्ध अभिजीत वंजारी-काँग्रेस राष्ट्रवादीचे नितेश कराळे-अपक्ष

4) अमरावती शिक्षक मतदार संघ- एकूण मतदार- 35810 मतदार

कोणाकोणामध्ये होणार लढत?

अदिती पोहरे-काँग्रेस, दत्तात्रय लहाने-ठाकरे गट किरण सरनाईक-शिवसेना दिलीप कडू- विदर्भ.माध्यमिक.शिक्षक संघ

श्रीकांत देशपांडे माजी आमदार -शिवसेना बंडखोर

शेखर भोयर- भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे (भाजप बंडखोर)

सुमित पवार- भाजप आमदार उमेश यावलकर यांचे निकटवर्तीय (भाजप बंडखोर)

संगीता शिंदे- भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या बहिण (भाजप बंडखोर)

5) संभाजीनगर पदवीधर मतदार संघ- एकूण मतदार- 326701

कोणाकोणामध्ये होणार लढत?

सतिश चव्हाण-राष्ट्रवादी विरुद्ध दिलिप घुगे-ठाकरे गट प्रतापसिंह पाटील-राष्ट्रवादी शरद पवार

राज्यातील 5 विधान परिषदेच्या जागांसाठी 23 तारखेला मतदान होणार असून प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत, 27 तारखेला याची मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण सरस ठरणार तसेच कोणाला धक्का बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याआधीच्या निवडणुकीत काय घडलं होतं? कोणाला किती मतं मिळाली होती?

मराठवाडा पदविधर मतदार संघ-सतिश चव्हाण 57895 मतांनी विजयी झाले होते …त्यांना 116638 मते मिळाली होती त्यांनी भाजपचे शिरिश बोराळकर यांचा पराभव केला होता.

पुणे पदविधर मतदार संघ- राष्ट्रवादीचे उमेदवार अरूण लाड (महाविकास आघाडी) – 1 लाख 22 हजार 145 मतं घेत 48 हजार 824 मतांनी विजयी त्यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला होता.

पुणे शिक्षक मतदार संघ-काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांचा पराभव केला होता..10 हजार 626 मतांनी विजय झाला.त्यांना 25985 मतं मिळाली होती.

अमरावती शिक्षक मतदार संघ-अपक्ष म्हणून उभा राहिलेले किरण सरनाईक यांनी विजय मिळवला होता..त्यांना 15606 मतं मिळाली होती त्यांनी मविआचे श्रीकांत देशपांडेंचा पराभव केला होता..भाजपचे उमेदवार नितिन धांडे 7 नंबरवर होते.

नागपूर पदविधर मतदार संघ-काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला. वंजारी यांना 61701 मंत मिळाली तर जोशी यांना 42791 मंत मिळाली..18910 मतांनी वंजारी विजयी..1978 नंतरचा पहिल्यांदा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?