AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ

पोलिसांनी संपूर्ण दिल्लीमध्ये कलम 163 लागू केले आहे. दिल्लीमधील राजीव चौक तसेच इतर पाच मेट्रो स्टेशनवरील प्रवेशद्वार तसेच बाहेर जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काहीही झालं तरी आम्ही संसदेकडे कूच करणारच, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ
abhijeet dipke and cockroach janta partyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2026 | 5:34 PM
Share

Delhi Jantar Mantar Protest : सध्या दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू आहे. सीजेपीने आज संसद मार्च काढला जाणार असल्याचे अगोदरच जाहीर केले होते. या आंदोलनात देशभरातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर आता दिल्लीमध्ये हजारो आंदोलकांनी संसदेकडे कूच केले आहे. तर आंदोलकांना रोखण्यासाठी शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातोय. काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. असे असतानाच आता सीजीपीचे प्रतिनिधी आणि केंद्रात मंत्री असलेले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जे पी नड्डा यांच्यात बैठक झाली आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं? कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे आता समोर आले आहे.

सौरभ दास आणि आशुतोष रांका नड्डा यांच्या भेटीला

पोलिसांनी संपूर्ण दिल्लीमध्ये कलम 163 लागू केले आहे. दिल्लीमधील राजीव चौक तसेच इतर पाच मेट्रो स्टेशनवरील प्रवेशद्वार तसेच बाहेर जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काहीही झालं तरी आम्ही संसदेकडे कूच करणारच, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. तर दुसरीकडे संपूर्ण संसदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली आहे. सीजेपीचे शिष्टमंडळ तसेच जे पी नड्डा यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर सौरभ दास यांनी आपल्या सोशल मीडियावर बैठकीत काय झालं, याविषयी माहिती दिली. दोन महिने वाट पाहून जे पी नड्डा यांच्याशी फक्त दहा मिनिटेच भेट होऊ शकली, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही आमच्या मागण्यांचे लिखीत पत्र त्यांना दिले आहे. आम्ही अंतर्गत या मागण्यांवर चर्चा करू, असे आश्वासन नड्डा यांनी दिल्येचेही त्यांनी सांगितले.

नेमक्या मागण्या काय?

तसेच, सोनम वांगचूक यांची लवकरात लवकर सुटका करावी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नीट परीक्षेमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटींची आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्याही सीजेपीने केल्या आहेत. आता सरकार यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...