AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest Delhi : अभिजित दीपकेंच्या दाव्याने एकच खळबळ, वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी…दिल्लीच्या आंदोलनात काय घडलं?

पोलीस आमच्यावर कारवाई का करत आहेत, तेच आम्हाला कळत नाहीये. आम्ही इथे शांतपणे बसलेलो आहोत. जोपर्यंत बैठक होत नाही, तोपर्यंत आम्ही इथेच थांबू असे आम्ही पोलिसांना सांगत आहोत. तरीदेखील पोलीस ऐकत नाहीयेत. मुलांची डोके फोडली आहेत, असा आरोप अभिजित दीपके यांनी केला.

CJP Protest Delhi : अभिजित दीपकेंच्या दाव्याने एकच खळबळ, वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी...दिल्लीच्या आंदोलनात काय घडलं?
abhijeet dipke and cockroach janta partyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2026 | 3:21 PM
Share

Delhi Jantar Mantar Protest : कॉकरोच जनता पार्टीतर्फे दिल्लीमध्ये मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. सीजेपीकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात आहे. गेल्या 22 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू होते. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्याकडूनही उपोषण चालू होते. आता हे उपोषण संपलेले असून संसद मार्चची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातून आंदोलक दिल्लीमध्ये पोहोचले असून संसदेकडे कूच करत आहेत. हजारो आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. असे असतानाच आता सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मोठा दावा केला आहे. सोनम वांगचूक यांच्या पत्नीवर पुरुष पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यांच्या केसांना ओढून त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा दावा दीपके यांनी केलाय.

सोनम वांगचूक यांच्या पत्नीचे केस पकडून…

दीपके यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना त्यांनी पोलिसांची गुंडागर्दी चालू आहे, असा आरोप केला. तसेच सरकारकडून जोपर्यंत काही सांगितले जात नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन चालूच राहील, असं ठणकावून सांगितलं आहे. सोनम वांगचूक यांच्या पत्नीवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला. एका पुरुष पोलिसाने महिलेवर लाठीचार्ज केला आहे. सोनम वांगचूक यांच्या पत्नीचे केस पकडून त्यांना ट्रकच्या खाली खेचण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलिसांना अडवले. असं का करताय, हे विचारलं. सोनम वांगचूक यांच्या पत्नीसोबत तुम्ही असं कसं वागू शकता, असा जाब आम्ही त्यांना विचारला. उत्तर देताना थांबा तुमच्या सगळ्यांचीच मस्ती काढतो, असं आम्हाला पोलीस अधिकारी म्हणाला, अशी माहिती यावेळी दीपके यांनी दिली.

लढा आणखी तीव्र केला जाणार

तसेच, पोलीस आमच्यावर कारवाई का करत आहेत, तेच आम्हाला कळत नाहीये. आम्ही इथे शांतपणे बसलेलो आहोत. जोपर्यंत बैठक होत नाही, तोपर्यंत आम्ही इथेच थांबू असे आम्ही पोलिसांना सांगत आहोत. तरीदेखील पोलीस ऐकत नाहीयेत. मुलांची डोके फोडली आहेत. मुलींवरही पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केलेला आहे. आम्ही शांतपणे बसून राहणार आहोत. आमचे आंदोलन इथेच असेल, असे सांगत लढा आणखी तीव्र केला जाईल, असं सूचित केलं. सरकारकडून जोपर्यंत काही सांगितले जात नाही. तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील. गुंडगिरी चालू आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. त्यामुळे या आंदोलनामध्ये पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...