Saif ALi Khan : एकीकडे लाखोंचं भाडं, दुसरीकडे फ्लॅटची विक्री; सैफ अली खानच्या प्रॉपर्टीची चर्चा
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने मुंबईतील एक अपार्टमेंटची मोठी डील केली आहे. त्याने 19 वर्षांपूर्वीच्या प्रॉप्रटीतील एक भाग कोट्यवधींना विकला आहे.

अब्जावधींच्या संपत्तीचा मालक असलेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान म्हणजे नवाब. त्याने नुकतीच मुंबईतील एका प्रॉपर्टीशी संबंधित एक मोठी डील केली होती. त्याने एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला त्याच्या 2 ऑफीस स्पेस भाड्याने दिल्या होत्या. आता अशी माहिती समोर आली आहे की त्याने त्याची एक लग्झरी प्रॉपर्टी विकली आहे. 19 वर्षांपूर्वीची असलेली ही प्रॉपर्टी 4 कोटींपेक्षा जास्त किमतीला विकली गेली आगेय
सैफने 4.11 कोटींना विकला फ्लॅट
CRE Matrix द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानेयाने मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील एक फ्लॅट, दोन पार्किंगसह 4.11 कोटींना विकला. त्याचा कार्पेट एरिया 787 स्क्वेअर फीट आहे. 19 ऑक्टोबर 2026 ला ही डील झाली. तर ॲग्रीमेंट टू सेल हे 7 मराच्, 2024 चं होतं.
19 वर्षांपूर्वी विकत घेतली होती प्रॉपर्टी
खरेदीदाराला या फ्लॅटचा ताबा 7 मार्च 2024 रोजी मिळाला होता. या व्यवहारासाठी 24.66 लाख रुपयांची मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरण्यात आली आहे. सैफ अली खान याची ही प्रॉपर्टी वांद्रे पश्चिम येथील ‘हाय-कॉन्स रेसिडेन्सी’ या इमारतीत आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार, सैफ अली खान याने 2007 मध्ये ‘हाय-कॉन्स रेसिडेन्सी’च्या वरच्या मजल्यावरील एक युनिट 9.7 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. या युनिटचं कार्पेट क्षेत्रफळ 6000 चौरस फूट होतं. त्यानंतर सैफने या युनिटचे तीन भाग करून तीन स्वतंत्र फ्लॅट तयार केले.
22 लाखांहून अधिक भाड्याने दिली प्रॉपर्टी
काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान याने त्याचे दोन व्यावसायिक युनिट्स ‘दुर्वा फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला दरमहा 22.76 लाख रुपये भाड्याने दिले होते. ही प्रॉपर्टी मुंबईतील अंधेरी-कुर्ला रोडवर असून, तिचं एकूण कार्पेट क्षेत्रफळ 5,692 चौरस फूट आहे.
सैफचं काम
गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या ‘हैवान’ मध्ये सैफ दिसला होता, त्याच्यासोबत अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत होता. मात्र ब़क्स ऑफीसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. नुकताच सैफ हा, त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर -खान हिच्यासोबत मकॉमेडिअन कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीजन 5’ या शोमध्ये दिसला होता.
