Vastu Shastra : या 4 वस्तू शनिवारी कधीच खरेदी किंवा विक्री करू नका, शनि देव होतील नाराज, कायम जाणवेल पैशांची अडचण
हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या तरी देवाला समर्पित आहे. शनिवार हा वार शनि देवांना समर्पित आहे. या दिवशी काही विशिष्ट गोष्टी खरेदी किंवा विक्री करू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. यामुळे घरात शनिदोष निर्माण होतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या तरी देवाला समर्पित आहे. जसं की सोमवार हा भगवान महादेव यांना समर्पित आहे. मंगळवार देवीला समर्पित आहे. गुरूवार दत्त महाराजांना समर्पित आहे, त्याचप्रमाणे शनिवार हा वार देखील शनि देवांना समर्पित आहे. या दिवशी शनि महाराजांची उपासना केल्यास शनि महाराजांची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते, आयुष्यातील सर्व प्रकारची साडेसाती दूर होते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही विशिष्ट गोष्टी आहेत, ज्या शनिवारी खरेदी करणं किंवा विक्री करणं अशुभ मानलं जातं, कारण यामुळे घरात शनि दोष निर्माण होतो. ज्या घरात शनि दोष निर्माण होतो, अशा घरात अनेक समस्या येतात. कायमच पैशांची समस्या जाणवते, काहीही कारण नसताना घरात सारखी भांडणं होतात. अशाप्रकारे घरात शनिदोष निर्माण होऊ नये, यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेऊयात. वास्तुशास्त्रानुसार 4 अशा गोष्टी आहेत, ज्या कधीही शनिवारच्या दिवशी खरेदी किंवा विक्री करू नये, कारण त्यामुळे घरात शनिदोष निर्माण होतो.
लोखंड – वास्तुशास्त्रामध्ये लोखंड हे शनिदेवांचा धातू मानला जातो. त्यामुळे कधीही चुकूनही शनिवारच्या दिवशी लोखंडाची खरेदी किंवा विक्री करू नये, तसेच शनिवारी लोखंड कोणाला दान देखील देऊ नये, असे केल्यास घरात शनिदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
मोहरीचं तेल – हिंदू धर्मशास्त्रानुसार मोहरीचं तेल हे शनि देवांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे दर शनिवारी शनि देवांना मोहरीचं तेल अर्पण करावं, यामुळे शनि देवांची कृपा सदैव तुमच्यावर राहते. परंतु कधीही शनिवारी मोहरीचं तेल विक्री करू नये, अथवा खरेदी करू नये.
मीठ – वास्तुशास्त्रानुसार शनिवारी कधीही मिठाचं दान करू नये, तसेच त्याची विक्री करू नये, अथवा ते खरेदी देखील करू नये. यामुळे घरात शनिदोष निर्माण होतो.
काळे तीळ – वास्तुशास्त्रानुसार कधीही शनिवारी काळे तीळ दान करू नये, तसेच त्याची खरेदी किंवा विक्री करू नये, त्यामुळे घरात शनिदोष निर्माण होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
