AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff : टायगर श्रॉफवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ; मनोज वाजपेयींची प्रतिक्रिया चर्चेत

Manoj Bajpayee Reaction : टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारामुळे अख्खी मुंबई हादरली. बॉलिवूड सेलिब्रिटीची दहशतीत आहेत. आता या घटनेवर अभिनेता मनोज वाजपेयीने प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले ते ?

Tiger Shroff : टायगर श्रॉफवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ; मनोज वाजपेयींची प्रतिक्रिया चर्चेत
| Updated on: Oct 22, 2026 | 8:00 PM
Share

Manoj Bajpayee Reaction: अभिनेता टायगर श्रॉफ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. रविवार, 18 ऑक्टोबर रोजी काही हल्लेखोरांनी टायगरवर गोळीबार केला. मात्र सुदैवाने टायगर या हल्ल्यातून बालंबाल बचावला, त्याला थोडीफार जखम झाली. मात्र त्याच्या कारचा ड्रायव्हर आणि रस्त्यावरील एका व्यक्तीला मात्र गोळी लागून ते जखमी झाले. दोघांवरही उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती हळूहळू सुधारते आहे. मात्र टायगरवरील या हल्ल्यामुळे मुंबईकर हादरले असून बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली असून आता अभिनेते मनोज वायपेयी यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये मनोज वायजपेयींना, गोळीबाराच्या या घटनेबद्दल विचारण्यात आलं. हा संपूर्ण प्रकार अतिशय घाबरवणारा आणि चिंताजनक असल्याचं ते म्हणाले. टायगर श्रॉफ सुरक्षित असल्याचा आणि त्यांच्या ड्रायव्हरची प्रकृतीही आता सुधारत असल्याचा आनंद मनोज बाजपेयी यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले मनोज वाजपेयी ?

त्यांच्या ‘गजब रात’ या नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान मनोज बाजपेयी यांना टायगर श्रॉफसोबत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “ मला ही टोळीयुद्धाची (गँगवॉर) घटना वाटत नाही. मात्र, कुठूनही गोळ्या झाडल्या जात आहेत आणि हे खरंच खूप भीतीदायक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, टायगरसोबत जे घडलं ते दुःखद आहे. पण सर्वांत चांगली आणि आनंदाची बाब म्हणजे तो सुरक्षित आहे आणि त्याच्या ड्रायव्हरच्या प्रकृतीतही हळूहळू सुधारणा होत आहे” असं त्यांनी सांगितलं.

या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेल, अशी आशा मनोज बाजपेयी यांनी पुढे व्यक्त केली. ते म्हणाले, तसं पाहिलं तर आपण काह कायदा आणि सुव्यवस्थेचे तज्ज्ञ नाही. मी बातम्यांमध्ये जे ऐकलं आहे, त्यानुसार या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना मुंबईत आणण्यात आलं असून त्यांना अटकही करण्यात आल्याचं मनोज बाजपेयी यांनी सांगितलं. या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, “ मला एवढीच आशा आहे की या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि अशी घटना घडवून आणणाऱ्यांविरोधात एक उदाहरण निर्माण होईल. जेणेकरून भविष्यात असं काही करण्यापूर्वी कोणीही अनेकदा विचार करेल.”

मोठे सेलिब्रिटी होते निशाण्यावर

मुंबई क्राईम ब्रांचनुसार, तपासात अशी माहिती समोर आली की हल्लेखोरांचं टार्गेट हा टायगर श्रॉफ नव्हता. तीन आरोपी खरंतर एका मोठ्या सेलिब्रिटीला टार्गेट करण्याचा प्लान आखत होते. मात्र मोठमोठ्या सेलिब्रिटींची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक असल्याने हल्लेखोरांनी टायगर श्रॉफला टार्गेटत करत त्याच्यावर गोळीबार केला.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ