AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी शरद पवार गटातून हकालपट्टी, कराळे मास्तर ढसाढसा रडले, पक्षासाठी काय केलं? गणीतच मांडलं

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, नितेश कराळे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे, त्यानंतर ते चांगलेच भावुक झाल्याचं पहायला मिळालं. त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटातून हकालपट्टी, कराळे मास्तर ढसाढसा रडले, पक्षासाठी काय केलं? गणीतच मांडलं
nitesh karale Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 7:53 PM
Share

23 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी  विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राज्यात पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये दोन शिक्षक मतदारसंघ आणि तीन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नागपूर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या नितेश कराळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अभिजीत वंजारी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र असं असताना देखील नितेश कराळे यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सहा वर्षांसाठी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान पक्षाकडून झालेल्या या कारवाईनंतर नितेश कराळे हे चांगलेच भावुक झाले आहेत. त्यांना आश्रू नावर झाले आहेत.

नेमकं काय म्हणाले कराळे? 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर  नितेश कराळे चांगलेच भावुक झाले आहेत. पक्षासाठी 110 सभा घेतल्या, आता जनताच मतदानातून उत्तर देईल,  असं त्यांनी म्हटलं आहे. मीडियाच्या माध्यमातून मला हकालपट्टीची माहिती मिळाली, पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार, मात्र कारवाई चुकीची आहे.  विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी राज्यभर प्रचार केला, स्वतःच्या क्लासकडे दुर्लक्ष करून काम केलं, असं यावेळी करावेळ मास्तर यांनी म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेसकडून पक्षावर दबाव टाकला जात असावा, अशी शंका आहे. उद्याच्या मतदानात मतदार ताकद दाखवतील, असंही यावेळी कराळे यांनी म्हटलं आहे.

उद्या मतदान 

दरम्यान राज्यातील 5 विधान परिषदेच्या जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ, पुणे शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघ या मतदारसंघाचा समावेश आहे. तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या विधान परिषदेमध्ये मतदार कोणाच्या बाजुने कौल देणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ