AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! 23 दिवसांचा लढा, नड्डांशी शिष्टमंडळाची भेट होताच सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत मोठा बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि कॉकरोच जनता पार्टी च्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

सर्वात मोठी बातमी! 23 दिवसांचा लढा, नड्डांशी शिष्टमंडळाची भेट होताच सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे
Sonam Wangchuk hunger Strike EndImage Credit source: Google
| Updated on: Jul 20, 2026 | 5:23 PM
Share

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत मोठा बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि कॉकरोच जनता पार्टी च्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. वांगचुक हे 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या सोबत इतर आंदोलकांसह AISA या विद्यार्थी संघटनेचे तीन सदस्यही उपोषणात सहभागी होते. सरकारकडून चर्चेची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर आता उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वांगचुक यांच्या पत्नीने केले होते भाष्य

रविवारी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी रविवारी सांगितले होते की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा मुद्दा राजकीय पक्षांनी उपस्थित करण्याचे आश्वासन दिल्यास वांगचुक आपले उपोषण मागे घेतील. त्यानंतर आज वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीमध्ये चर्चेला सुरुवात

आज (सोमवार) केंद्र सरकारने कॉकरोच जनता पार्टी सोबत चर्चेची प्रक्रिया सुरू केली. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास आणि नेते आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, हीच आपल्या पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे CJPने म्हटले आहे.

जेपी नड्डा यांनी चर्चेची माहिती दिली

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ‘आज सकाळी प्रथमच आंदोलकांच्या वतीने सरकारशी चर्चा करण्याचा प्रस्ताव आला. सकाळी 11.50 वाजल्यापासून आमची चर्चा सुरू आहे. अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात बैठक पार पडली. त्यांच्या शिष्टमंडळासोबत प्रथम सविस्तर तोंडी चर्चा झाली आणि सायंकाळी सुमारे 4 वाजता त्यांनी मला लेखी निवेदनही दिले.’

अभिजीत दिपके आणि AISA सदस्यांनीही उपोषण सोडले

यापूर्वी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही आपले उपोषण मागे घेतले होते. तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) चे तीन सदस्यांनीही उपोषण सोडले आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी