CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सीजेपीचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेनंतर आंदोलनाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले असून अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे सोनम वांगचुक यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 20, 2026 05:40 PM
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश