AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर

मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर

| Updated on: Jul 20, 2026 | 4:56 PM
Share

दिल्लीतील संसद परिसरात सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय गृह सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांची उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दिल्लीतील संसद परिसरात सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय गृह सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांची उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. संसद परिसरात अजूनही मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांना कशा प्रकारे नियंत्रित करायचे, सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याची आवश्यकता आहे का, तसेच आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची, यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा सुरू आहे.

दरम्यान, संसद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. आंदोलनकर्ते अद्यापही संसद भवनाबाहेर ठामपणे उभे असल्याने, या उच्चस्तरीय बैठकीतून नेमका काय निर्णय घेतला जातो आणि आंदोलनावर कोणता तोडगा निघतो, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 20, 2026 04:56 PM

Follow Us
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत...

इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत..

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान.

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक