AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाचे पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येला, भारतात दिसणार की नाही? वाचा…

सूर्यग्रहणाची वेळ खूप महत्वाची मानली जाते. तर 2026 चे पहिले सूर्यग्रहण कधी आहे तसेच हे सूर्यग्रहण भारतात दिसेल का त्याचा सुतक काळ भारतात वैध असेल का हे सर्व आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

यंदाचे पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येला, भारतात दिसणार की नाही? वाचा...
Solar EclipseImage Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Feb 04, 2026 | 11:38 PM
Share

सनातन धर्मात फाल्गुन महिना खूप विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. तर या वर्षातील पहिले सूर्यग्रहण फाल्गुन महिन्यात येणार आहे. सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते. खगोलशास्त्रानुसार जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे सूर्याला अंशतः किंवा पूर्णपणे झाकले जाते. तसेच सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येच्या दिवशी होते.

ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू हे ग्रह सूर्यग्रहण करतात. सूर्यग्रहणाची वेळ खूप महत्वाची मानली जाते. तर 2026 चे पहिले सूर्यग्रहण कधी होणार आहे. तसेच हे सूर्यग्रहण भारतात दिसेल का? तसेच या सुर्यग्रहणाचा सुतक काळ भारतात वैध असेल का? आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

सूर्यग्रहण कधी होईल?

2026 मधील पहिले सूर्यग्रहण हे फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. तर 17 फेब्रुवारी रोजी फाल्गुन अमावस्या असून या दिवशी सूर्यग्रहण दिसणार आहे. ज्योतिषांच्या मते, हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे.तर हे कंकणाकृती सुर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या अगदी मध्यभागी येतात आणि चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. यामुळे सूर्य आगीच्या वलयासारखा दिसतो आणि आकारानेही लहान दिसतो. तर हे सुर्यग्रहण एका चमकत्या ब्रेसलेटसारखा दिसतो. खगोलशास्त्रज्ञ याला रिंग ऑफ फायर असेही म्हणतात.

या राशीला सूर्यग्रहण लागणार

2026 मधील हे पहिले सूर्यग्रहण शनीची रास कुंभ राशीत लागणार आहे. या ग्रहणाच्या वेळी सूर्य कुंभ राशीत भ्रमण करेल. सूर्यासोबत राहू देखील कुंभ राशीत असेल. पण या सुर्यग्रहणाचा वाईट प्रभाव या राशीवर पडणार नाही.

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही

2026 या वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजून 56 मिनिटांनी सुरू होईल. ते सायंकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी संपेल. वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये, त्यामुळे त्याचा आपल्या देशावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. शिवाय, भारतात सुतक काळ देखील पाळला जाणार नाही.

या देशांमध्ये दिसणार सूर्यग्रहण

  • दक्षिण आफ्रिका
  • दक्षिण अर्जेंटिना
  • अंटार्क्टिकाचे प्रदेश

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ