AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Varma: देवाने मला दिलेली सर्वात मौल्यवान भेट… तिलक वर्मासाठी आमदार मित्राची काळजाला भिडणारी पोस्ट; काय लिहिलं?

MLA Emotional Message for Tilak Varma: एकीकडे क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकणारा तिलक वर्मा, तर दुसरीकडे त्याच्या वाढदिवसानिमित्त आमदार मित्राने व्यक्त केलेल्या या भावनांची सध्या चर्चा रंगली आहे.

Tilak Varma: देवाने मला दिलेली सर्वात मौल्यवान भेट... तिलक वर्मासाठी आमदार मित्राची काळजाला भिडणारी पोस्ट; काय लिहिलं?
Tilak Varma Birthday
| Updated on: Nov 08, 2026 | 11:42 PM
Share

भारतीय क्रिकेट संघातील युवा फलंदाज तिलक वर्माचा आज (8 नोव्हेंबर 2026) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या शुभेच्छांमध्ये एका खास व्यक्तीच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही पोस्ट आहे तिलक वर्माचा जवळचा मित्र आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रम काकडे यांची.

विक्रम काकडे यांनी तिलक वर्मासाठी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून दोघांमधील घट्ट मैत्री आणि जिव्हाळ्याचे नाते स्पष्टपणे दिसून येते. तिलक हा केवळ आपला मित्र नसून कुटुंबातील सदस्यासारखा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आमदार विक्रम काकडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, माझ्या पालकांनी मला एक अतिशय प्रेमळ बहीण दिली आहे आणि देवाने मला तुझ्यासारखा भाऊ दिला आहे. तू माझ्या कुटुंबात जन्माला आला नाहीस, पण माझ्या आयुष्यात येणे कदाचित नशिबातच होते. तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी देवाचा सदैव ऋणी राहीन, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

तिलक वर्मा माझ्या आयुष्यात एखाद्या देवदूताप्रमाणे आला. त्याने माझ्या आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण आणले. तो माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. माझ्या कुटुंबात जन्मलेला नसतानाही तो माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, असे काकडे यांनी म्हटले आहे. तिलकला आनंदी पाहणे, त्याची क्रिकेटमधील प्रगती पाहणे आणि त्याची स्वप्ने पूर्ण होताना पाहणे याचा मला आनंद होतो. त्याच्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे. आयुष्यात कितीही बदल झाले, आपण कोणत्याही वळणावर पोहोचलो, तरी आपल्यातील नाते कायम खास राहील, असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

या पोस्टमधील शेवटच्या ओळींनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. देवाने मला दिलेल्या सर्वात मौल्यवान भेटवस्तूंपैकी तू एक आहेस. केवळ माझा शेवटचा श्वासच मला तुझ्यापासून दूर करू शकेल,’ अशा शब्दांत विक्रम काकडे यांनी तिलकप्रती असलेले प्रेम व्यक्त केले आहे. विक्रम काकडे आणि तिलक वर्मा यांच्यातील मैत्री अनेकदा चर्चेत आली आहे. काकडे यांच्या आमदारकीच्या शपथविधी सोहळ्यालाही तिलक वर्मा उपस्थित होता. त्यामुळे दोघांमधील मैत्री केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांच्यात चांगले जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे दिसून येते.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा