AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4,00,000 पाहुणे, बक्षीस म्हणून थार, देशातील या शाही विवाहाची का होतेय चर्चा? खर्च इतका की…

अनंत सिंह यांच्या कन्या शिवांगीच्या शाही लग्नाची सध्या देशभरात चर्चा आहे. चार लाख पाहुण्यांसाठी भव्य तयारी केली असून, पंतप्रधान मोदींसह अनेक बड्या नेत्यांना आणि सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यात घोडेस्वारी स्पर्धेत थार बक्षीस म्हणून मिळणार आहे. पर्यावरणाची काळजी घेत फटाक्यांविना हा बिहारमधील सर्वात मोठा विवाह सोहळा होणार आहे.

4,00,000 पाहुणे, बक्षीस म्हणून थार, देशातील या शाही विवाहाची का होतेय चर्चा? खर्च इतका की...
royal weddingImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2026 | 11:24 PM
Share

जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांची छोटी कन्या शिवांगी हिच्या लग्नाची देशभरात चर्चा सुरू आहे. अनंत सिंह आपल्या कन्येचा विवाह अगदी धुमधडाक्यात करणार आहेत. या शाही विवाह सोहळ्यासाठी देशभरातील लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. राजकीय पक्षाचे नेते आणि सेलिब्रिटींनाही या सोहळ्यासाठी खास आमंत्रण देण्यात आलं आहे. तब्बल चार लाख पाहुणे या लग्नाला येणार आहेत. त्यामुळे या लग्नाची देशभर चर्चा सुरू झाली आहे.

अनंत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि इतर अनेक बडे नेते या लग्नाला येणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, लोकगायिका मैथिली ठाकूर, खासदार आणि गायक मनोज तिवारी आदींनाही या लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय भोजपुरी स्टार पवन सिंह, अक्षरा सिंह या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहेत.

थार जिंका…

या लग्न सोहळ्यात घोडेस्वारीही ठेवण्यात आली आहे. या घोडेस्वारी स्पर्धेत जिंकणाऱ्याला चक्क थार बक्षीस देण्यात येणार आहे. दुसरा क्रमांक पटकावणाऱ्याला मोटारसायकल बक्षीस म्हणून देणार आहे.

4 लाख लोक येणार

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लग्न सोहळ्यात फटाके फोडले जाणार नाही. पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाणार आहे. या लग्न सोहळ्याला तब्बल 4 लाख लोक येणार आहेत. त्यामुळे चार लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

या लग्नासाठीची संपूर्ण तयारी झाली आहे. ज्या ज्या लोकांना अनंत सिंह ओळखतात त्या सर्वांना लग्नाचं आमंत्रण दिलं जात आहे. बिहारच्या इतिहासातील हे सर्वात मोठं लग्न असणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या लग्न सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या लग्न सोहळ्याच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच या लग्न सोहळ्याच्या माध्यमातून अनंत सिंह हे आपली ताकद दाखवत असल्याचंही सांगितलं जात आहे. या लग्न सोहळ्यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला आहे. मात्र, नेमके किती कोटी खर्च होणार हा आकडा अद्याप समोर आलेला नाहीये.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा