IND vs NZ Final : टीम इंडियाने फायनलमध्ये टॉस जिंकला, न्यूझीलंड विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल
India vs New Zealand 3rd Odi Toss Result : टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे कोणता संघ मालिकेवर नाव कोरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मालिका विजेता संघ ठरणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता भारताच्या बाजूने या निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार शुबमन गिल याने फिल्डिंगचा निर्णय घेत पाहुण्या न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता भारतीय गोलंदाज न्यूझीलंडला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाकडून 1 बदल
टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये या तिसऱ्या सामन्यासाठी एकमेव आणि अपेक्षित बदल केला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर प्रसिधच्या जागी अर्शदीप सिंह याला संधी देण्यात आली आहे. प्रसिधने दुसऱ्या सामन्यात बॉलिंगने निराशा केली होती. तसेच निर्णायक क्षणी कॅचही सोडला होता. तेव्हापासून प्रसिधचा तिसऱ्या सामन्यातून पत्ता कट होणार असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर तसंच झालंय.
तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर तिसऱ्या मॅचसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. न्यूझीलंडने त्याच प्लेइंग ईलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचा इंदूरमध्ये दबदबा, पराभव अशक्य!
दरम्यान टीम इंडियाचा वनडेत इंदूरमध्ये दबदबा राहिला आहे. भारताने या मैदानात 2006 पासून खेळवण्यात आलेल्या सर्व एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने 2006 ते 2023 दरम्यान एकूण 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया या मैदानातील आठवा सामना जिंकून मालिका नावावर करणार की न्यूझीलंड नववर्षातील पहिली आणि एकदिवसीय मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : टीम इंडियाने फायनलमध्ये टॉस जिंकला, न्यूझीलंड विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
टीम इंडिया टॉसचा बॉस
🚨 Toss Update 🚨 #TeamIndia win the toss in the decider and elect to bowl first.
Updates ▶️ https://t.co/KR2ertVUf5#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2VBlbox60u
— BCCI (@BCCI) January 18, 2026
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : डेव्हॉन कॉनव्हे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क आणि जेडेन लेनॉक्स.
