AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडला, मदतीसाठी एक तरुण पुढे आला पण नंतर जे घडलं ते…. डोंबिवली हादरली

डोंबिवलीत अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या सतीश कोरेला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. जखमीच्या हतबलतेचा फायदा घेत आरोपीने सोन्याची चैन चोरली होती.

अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडला, मदतीसाठी एक तरुण पुढे आला पण नंतर जे घडलं ते.... डोंबिवली हादरली
Dombivli Crime
| Updated on: Mar 05, 2026 | 7:37 AM
Share

संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे हे माणुसकीचे लक्षण मानले जाते. मात्र डोंबिवलीत या भावनेलाच काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने त्याच्याच गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या नराधमाला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सतीश कोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पश्चिमेकडील गोपी चौक परिसरात राहणारे तुषार शिंदे हे एक वृद्धाश्रम चालवतात. काही दिवसांपूर्वी तुषार आपल्या दुचाकीवरून मानकोली-मोठा गाव ब्रिजवरून जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. त्यांना मदतीची नितांत गरज होती. असे असताना सतीश कोरे नावाचा तरुण पुढे आला. त्याने माणुसकी दाखवल्याचा आव आणत तुषार यांना रिक्षामध्ये बसवले. यानंतर तो उपचारासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या दिशेने निघाला.

तुषारला प्रचंड वेदना होत होत्या. याच वेळी रिक्षामध्ये असलेल्या आरोपी सतीश कोरेची नजर त्यांच्या गळ्यातील महागड्या सोन्याच्या चैनवर पडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याऐवजी सतीशच्या मनात लोभ निर्माण झाला. तुषार यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत त्याने जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली. धक्कादायक म्हणजे, यानंतर तुषार यांना तातडीने उपचार मिळवून देण्याऐवजी, सतीशने त्यांना शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातच सोडून दिले आणि तिथून पळ काढला.

विष्णूनगर पोलिसांची कारवाई

यानंतर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर तुषार शिंदे यांनी आपल्यासोबत घडलेला हा संतापजनक प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेचे गांभीर्य ओळखून विष्णूनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत मोरे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावात सापळा रचून सतीश कोरेला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली सोन्याची चैन हस्तगत केली आहे. दरम्यान या नराधमाने मदत करण्याच्या नावाखाली इतर कोणाला लुटले आहे का, याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...