IND vs NZ : टीम इंडिया सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज, न्यूझीलंड रोखणार?
India vs New Zealand 3rd Odi Live Streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कडवी झुंज असणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 2026 मधील पहिली आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका कोण जिंकणार? हे रविवारी स्पष्ट होणार आहे. उभयसंघात खेळवण्यात येत असलेली ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. यजमान टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. भारताने बडोद्यात 301 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं आणि सामना जिंकला होता. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिका सुरक्षित करण्याची संधी होती. मात्र न्यूझीलंडने दुसऱ्या आणि करो या मरो सामन्यात कमबॅक करत विजय मिळवला. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात मालिका विजेता ठरणार आहे.
त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना कुठे आणि कधी पाहायला मिळेल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
