IND vs NZ : फायनलसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल फिक्स! कुणाचा पत्ता कट होणार?
India vs New Zealand 3rd Odi Playing 11 : टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात मालिका जिंकण्याची संधी गमावली. या सामन्यात भारताच्या 2 खेळाडूंनी निराशा केली. त्यामुळे या दोघांना तिसऱ्या सामन्यातून डच्चू दिला जाऊ शकतो.

भारत विरुद्ध न्यूझीलंड 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगतदार स्थितीत आहे. उभयसंघातील मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिका विजेता कोण ठरणार? हे तिसऱ्या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तिसरा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. तिसऱ्या सामन्याचा थरार रविवारी 18 जानेवारीला इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांनी सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. न्यूझीलंडने मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर दुसरा सामना जिंकून कमबॅक केलं. त्यामुळे न्यूझीलंडचा विश्वास दुणावलेला आहे. तर भारताचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. त्यामुळे या अंतिम सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पहिल्या 2 सामन्यात काय झालं?
टीम इंडियाने बडोद्यात 11 जानेवारीला झालेल्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. त्यानंतर न्यूझीलंडने जोरदार मुसंडी मारत राजकोटमध्ये कमबॅक केलं. न्यूझीलंडने भारताला दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत केलं. न्यूझीलंडने अशाप्रकारे मालिकेत बरोबरी साधली. आता तिसर्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले जाऊ शकतात.
कुणाला डच्चू मिळणार?
टीम मॅनेजमेंट टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे. अपवाद वगळला तर टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये ठिकठाक सुरु आहे. हे 2 संभाव्य बदल लोअर ऑर्डरमध्ये अपेक्षित आहेत.
अर्शदीप सिंगची एन्ट्री होणार?
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला संधी दिली जाऊ शकते. प्रसिध कृष्णा याला या मालिकेत आतापर्यंत आपला ठसा उमटवता आलेला नाही. प्रसिधने दुसऱ्या सामन्यात निर्णायक क्षणी कॅचही सोडलेला. त्यामुळे प्रसिधला डच्चू देत त्याच्या जागी अर्शदीप सिंह याला संधी देण्यात येऊ शकते.
आयुषला पदार्पणाची संधी?
तसेच ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुसऱ्या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने काही खास करता आलं नव्हतं. त्यामुळे नितीशच्या जागी युवा आयुष बडोनी याला पदार्पणाची संधी मिळू शकते. मात्र हा अंतिम आणि निर्णायक सामना आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट निर्णायक सामन्यात असे धाडसी निर्णय घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर),आयुष बडोनी, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.
