Jalgaon News | अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जळगावच्या केळी उत्पादकांना बसताना दिसत आहे. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे केळीची निर्यात ठप्प झाली असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत सापडले आहेत.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जळगावच्या केळी उत्पादकांना बसताना दिसत आहे. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे केळीची निर्यात ठप्प झाली असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत सापडले आहेत. जळगाव जिल्ह्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात केली जाते. विशेषतः या महिन्यात आखाती देशांकडे मोठ्या प्रमाणात केळी पाठवली जाते. मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्यात प्रक्रिया थांबली असून सुमारे 100 कंटेनर अडकून पडल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे. निर्यात ठप्प झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केळीचा व्यापार करणारे व्यापारीही संकटात सापडले असून माल साठवणूक आणि वाहतूक खर्च वाढत आहे. तयार माल वेळेत परदेशात न गेल्यास तो खराब होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या या अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.
Published on: Mar 04, 2026 12:39 PM
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ

