Thackeray Brothers | ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील नाराजी अखेर दूर झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने ठाकरे गटासोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेने प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची मागणी केली होती. या मागणीला मान्यता देत दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील नाराजी अखेर दूर झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने ठाकरे गटासोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेने प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची मागणी केली होती. या मागणीला मान्यता देत दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आहे. त्यानुसार नॉर्थ प्रभाग समितीचे अध्यक्षपद दोन वर्षांसाठी मनसेकडे राहणार आहे. तसेच एसएनटी प्रभाग समितीचे अध्यक्षपद एक वर्षासाठी मनसेला देण्यात येणार आहे. एफ साऊथ प्रभाग समितीतही एक वर्ष अध्यक्षपद मनसेकडे असेल.
याशिवाय पी तसेच पूर्व आणि पश्चिम प्रभागांमध्ये प्रत्येकी एक वर्ष मनसे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी असणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव कमी झाल्याचे मानले जात असून, आगामी प्रभाग समिती निवडणुकांमध्ये एकत्रित लढत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समझोत्यामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होत असल्याचे दिसत आहे.
Published on: Mar 04, 2026 05:12 PM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द

