AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : स्पर्धेच्या इतिहासात या फ्रेंचायझीने बदलले सर्वाधिक कर्णधार, 17 जणांच्या खांद्यावर टाकली धुरा

IPL : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा कोणत्या संघाने आपला कर्णधार बदलला आहे? जाणून घ्या सविस्तर.

IPL : स्पर्धेच्या इतिहासात या फ्रेंचायझीने बदलले सर्वाधिक कर्णधार, 17 जणांच्या खांद्यावर टाकली धुरा
Pat Cummins IPL TrophyImage Credit source: PTI
| Updated on: Mar 19, 2026 | 3:40 AM
Share

आयपीएल स्पर्धा अवघ्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी कर्णधार बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काही संघांनी पर्याय नसल्याने कर्णधार बदलला आहे. आयपीएस स्पर्धेच्या इतिहासात एक संघाने 17 वेळा कर्णधार बदलला आहे. म्हणजेच 18 पर्वात 17 कर्णधार असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादला कर्णधार बदलाचा निर्णय घेणं भाग पडलं. कारण पॅट कमिन्स दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे सुरूवातीच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी सुरूवातीच्या सामन्यात इशान किशनला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र कर्णधार बदलणार की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे. सध्या तरी अजिंक्य रहाणेच कर्णधार आहे. मागच्या पर्वात सुमार कामगिरी झाल्याने कर्णधार बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण तसं तरी अद्याप दिसत नाही. दुसरीकडे, इशान किशन हा सनरायझर्स हैदराबादचा 11वा कर्णधार आहे. पण या यादीत 17 कर्णधार देणारा संघ अव्वल स्थानी आहे. चला जाणून घेऊयात हा संघ कोणता आहे आणि कोणते कर्णधार दिले ते…

पंजाब किंग्स कर्णधार बदलण्यात आघाडीवर

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक कर्णधार देणारी फ्रेंचायझी म्हणून पंजाब किंग्स आघाडीवर आहे. आतापर्यंत 18 पर्वात 17 जणांवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. युवराज सिंग, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, एडम गिलख्रिस्ट, डेविड हसी, जॉर्ज बेली, वीरेंद्र सेहवाग, डेविड मिलर, मुरली विजय, ग्लेन मॅक्सवेल, आर अश्विन, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शिखर धवन, सॅम करन, जितेश शर्मा आणि आता श्रेयस अय्यर या भूमिकेत आहे.

दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानी

दिल्ली कॅपिटल्स या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने 14 कर्णधार आतापर्यंत केले आहेत. सध्या कर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे आहे. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, गौतम गभीर, दिनेश कार्तिक, जेम्स होप्स, महेला जयवर्धने, डेविड वॉर्नर, केविन पीटरसन, जेपी डुमिनी, झहीर खान, करुण नायर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि फाफ डुप्लेसी यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादने 11 वा कर्णधार म्हणून इशान किशन याची नियुक्ती केली आहे. यापूर्वी कुमार संगकारा, कॅमरन व्हाइट, शिखर धवन, डॅरेन सॅमी, डेविड वॉर्नर, केन विलियमसन, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, मार्करम, पॅट कमिन्स यांनी कर्णधारपद भूषवलं आहे.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या यादीत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांनी 9 कर्णधार दिले आहेत. मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकर, हरभजन सिंह, शॉन पॉलक, ड्वेन ब्रावो, रिकी पॉन्टिंग, रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांना कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे.

आरसीबी

तर आरसीबीने राहुल द्रविड़, केविन पीटरसन, अनिल कुंबले, डॅनियल व्हीटोरी, विराट कोहली, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसी, रजत पाटीदार आणि जितेश शर्मा यांना कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

केकेआर

कोलकाता नाईट रायडर्सने सौरभ गांगुली, ब्रँडन मॅक्क्युलम, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन, श्रेयस अय्यर, नितीश राणा, अजिंक्य रहाणे यासह 8 कर्णधार दिले. तर राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्न, शेन वॉटसन, द्रविड, स्टीव स्मिथ, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि रियान परागसह 7 कर्णधार दिले.

सीएसके

चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सने प्रत्येकी 4 कर्णधार दिले. चेन्नई सुपर किंग्स पहिल्या पर्वापासून खेळत आहे आणि फक्त चार कर्णधार दिले. यात महेंद्रसिंह धोनी सर्वाधिक काळ कर्णधारपद भूषवलं. चेन्नई सुपर किंग्ससाठी महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनी कर्णधारपद भूषवलं. तर लखनौने केएल राहुल, कृणाल पांड्या, निकोलस पूरन आणि ऋषभ पंत यांना जबाबदारी दिली आहे. गुजरात टायटन्सचं नेतृत्व हार्दिक पंड्या, राशिद खान आणि शुबमन गिलने केलं आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा