AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज, नंबर 1 कोण?

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणाऱ्या 5 गोलंदाजांबाबत आपण जाणून घेणार आहोत. या 5 पैकी सर्वाधिक धावा कोणत्या गोलंदाजाने लुटवल्या? जाणू घ्या.

IPL : एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज, नंबर 1 कोण?
IPL Most Runs An OverImage Credit source: PTI
| Updated on: Mar 19, 2026 | 4:01 AM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला (IPL 2026) 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमानिमित्ताने क्रिकेट चाहत्यांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ‘रन’संग्राम पाहायला मिळणार आहे. 5 राज्यातील निवडणुकांमुळे बीसीसीआयकडून पहिल्या टप्प्याचंच वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार 16 दिवस 20 सामने खेळवण्यात येणार आहेत.  तर लवकरच 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे.  आयपीएल स्पर्धेत दररोज अनेक विक्रम होतात जे मोडीतही निघतात. क्वचित अपवाद वगळले तर गोलंदाजांची आयपीएलमध्ये धुलाई होतेच होते. या निमित्ताने आयपीएल स्पर्धेत एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

नियमांनुसार, एका ओव्हरमध्ये 6 बॉल टाकले जातात. फलंदाज एका अधिकृत चेंडूवर जास्तीत जास्त 6 असे एकूण 36 धावा मिळवू शकतो. मात्र आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एक ओव्हरमध्ये 37 धावा मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. आता एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या 5 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात. टॉप 5 गोलंदाजांमध्ये 4 भारतीय आहेत. तर 1 विदेशी गोलंदाज आहे.

पहिल्या स्थानी कोण?

प्रशांत परमेश्वरन आणि हर्षल पटेल या दोघांनी कहर केलाय. हे दोघे संयुक्तकित्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज आहेत. दोघांनी प्रत्येकी 37 धावा लुटवल्या आहेत.

प्रशांत परमेश्वरन आणि हर्षल पटेल याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज डॅनियल सॅम्स तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. डॅनियनलने एका ओव्हरमध्ये 35 धावा दिल्या आहेत.

खलील अहमद आणि परविंदर अवाना

खलील अहमद आणि परविंदर अवाना या दोघांनी आपल्या एका ओव्हरमध्ये प्रत्येकी 33-33 धावा दिल्या आहेत. खलील अहमद याने 2025 म्हणजेच गेल्याच मोसमात एकाच ओव्हरमध्ये 33 रन्स दिल्या होत्या. तर परविंदर अवाना याने 2014 साली एका षटकांत 33 धावा दिल्या होत्या.

प्रशांत-हर्षलची धुलाई

प्रशांतने आयपीएल 2011 साली कोच्ची टस्कर्स टीमकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या क्रिकेट सामन्यात सर्वाधिक 37 धावा केल्या होत्या. तर हर्षल पटेल याने 2021 साली आरसीबीकडून खेळताना 37 धावा लुटवल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी हर्षल पटेल याची धुलाई करुन एका ओव्हरमध्ये 37 धावा कुटल्या होत्या.

आयपीएलमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज

परविंदर अवाना, 33 धावा, 2014.

खलील अहमद, 33 धावा, 2025.

डॅनियन सॅम्स, 35 धावा, 2022.

हर्षल पटेल, 37 धावा, 2021.

प्रशांत परमेश्वरन, 37 धावा, 2011

Follow Us
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक