AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : गॉगल, सस्पेंडर अन् खिशात हात! मराठमोळ्या 23 महिन्यांच्या चिमुकल्याचा रुबाब पाहून नेटकरी थक्क

एखाद्याची हटके स्टाईल आत्मविश्वासा संपूर्ण वावर किंवा निरागस अंदाजही करोडो लोकांचे लक्ष वेधून घेतो याचाच प्रत्यय सध्या यवतमाळच्या वाघापूर परिसरात राहणाऱ्या रुद्रांश मंगेश सिसोदिया ठाकूर या 23 महिन्याच्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच वायरल झाला आहे. आठ दिवसात वायरल केलेल्या व्हिडिओला सोशल मीडियावर अकरा कोटी लोकांनी बघितले तर 90 लाख चहात्यांनी पसंती दिली.

Video :  गॉगल, सस्पेंडर अन् खिशात हात! मराठमोळ्या 23 महिन्यांच्या चिमुकल्याचा रुबाब पाहून नेटकरी थक्क
viral aura kidImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 10:20 PM
Share

सोशल मीडियावर कधी काय आणि आता कोणत्या पद्धतीत व्हायरल होईल याचा काही नेम नाही.एखाद्याची हटके स्टाईल आत्मविश्वासा संपूर्ण वावर किंवा निरागस अंदाजही करोडो लोकांचे लक्ष वेधून घेतो याचाच प्रत्यय सध्या यवतमाळच्या वाघापूर परिसरात राहणाऱ्या रुद्रांश मंगेश सिसोदिया ठाकूर या 23 महिन्याच्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच वायरल झाला आहे. आठ दिवसात वायरल केलेल्या व्हिडिओला सोशल मीडियावर 11 कोटी लोकांनी बघितले तर 90 लाख चाहत्यांनी पसंती दिली.

यवतमाळ येथील वाघापूर परिसरात रुद्रांश ठाकूर या 23 महिन्याच्या चिमुकल्याचा सामान्य कुटुंबात जन्म झाला. वडील मंगेश सिसोदिया ठाकूर हे वायफाय या खाजगी कंपनीत काम करतात तर आई खाजगी कंपनीमध्ये जॉब करते. ठाकूर कुटुंबीय दिवाळीनिमित्त दुचाकी खरेदी करण्यासाठी यवतमाळ येथील होंडा शोरूम इथे गेले होते .शोरूम मध्ये सजवलेल्या नव्या स्कूटर समोर रुद्रांशने दिलेल्या पोझने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.डोळ्यावर गॉगल अंगावर आकर्षक कपडे खांद्यावर सस्पेंडर आणि दोन्ही हात खिशात घालून उभा असलेल्या रुद्रांश ला पाहून उपस्थितांनीही त्याचे कौतुक केले. एवढ्या कमी वयात त्याचा आत्मविश्वास आणि कॅमेरासमोरचा सहज वावर पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

अवघ्या 16 सेकंदाच्या व्हिडिओने महाराष्ट्रातभर व्हायरल

रूद्रांशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर काही दिवसांतच तुफान व्हायरल झाला. अवघ्या 16 सेकंदाच्या या व्हिडिओला 11 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. त्याच्या स्टाईलमुळे लोकांनी आता त्याला ‘ऑरा किड’ असंही म्हणायला सुरूवात केली आहे.

रूद्रांशच्या आईवडिलांनी सांगितले की, ” माझ्यासाठी दुचाकी खरेदी करण्यासाठी आम्ही शोरूम ला गेलो होतो सहज व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. आणि करोडो लोकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे हीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. रूद्रांशच्या हटके लुकला नेटकऱ्यानी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याच्या रुबाबदार अंदाजामुळे काहींनी त्याला ‘छोटा डॉन’ तर काहींनी त्याला होंडा कंपनीचा नवीन ‘चेअरमन’ अशी म्हटले आहे. रुद्रांश ठाकूर या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसराची एक नवीन ओळख झाली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत असल्याने आम्हाला आनंद होत आहे.रुद्रांशची आई निशा ठाकूर यांनी सांगितलं की, मुलाला स्वतःच्या मर्जीने अशा प्रकारे पोज द्यायला आवडतं. त्याचा व्हिडीओ इतका व्हायरल होईल, याची कुटुंबीयांनाही कल्पना नव्हती

या व्हिडिओमुळे रूद्रांशला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे त्याच्या शिक्षणाची जबाबदारी! जिथे तो स्कूटर घ्यायला गेला त्याच शोरूमच्या मालकांनी साई पाँईट होडांचे मालक दिलीप बोबडे पाटील यांनी रूद्रांशचा व्हायरल व्हिडिओ पाहिला. त्यांनी त्याच्या कुटुंबाला बोलावून आनंद देखील साजरा केला. तसेच रूद्रांशच्या केजी – 1 पासून ते पदवीपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याचं आश्वासनही दिलं आहे.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण