AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात केसांना लावा एलोवेरा जेल; डँड्रफ अन् हेअर फॉलसह या समस्या होतील दूर

एलोवेरा फक्त त्वचेसाठी नाही तर केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. केसांना एलोवेरा जेल लावल्यामुळे केसांच्या अनेक समस्या तर दूर होतातच पण तुमच्या केसांची गुणवत्ताही सुधारते.

हिवाळ्यात केसांना लावा एलोवेरा जेल; डँड्रफ अन् हेअर फॉलसह या समस्या होतील दूर
हिवाळ्यात केसांना लावा एलोवेरा जेल; डँड्रफ अन् हेअर फॉल होईल दूर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 18, 2026 | 10:12 PM
Share

प्रत्येकालाच आपले केस लांबसडक, दाट, चमकदार आणि मुलायम असावेत असे वाटते. मात्र, बदलती जीवनशैली, प्रदूषण, केसांची योग्य काळजी न घेणे आणि ऋतुमानातील बदल यांमुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः हिवाळ्यात हवामान कोरडे झाल्यामुळे टाळूला खाज येणे, कोंडा होणे आणि केस कोरडे पडणे अशा समस्या जाणवू लागतात. या समस्यांवर उपाय म्हणून अनेक जण महागड्या हेअर केअर उत्पादनांचा वापर करतात. मात्र, घरच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या कोरफडीचा वापरही केसांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कोरफडीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना ओलावा मिळण्यास आणि त्यांची काळजी घेण्यास मदत होते. केसांच्या नियमित निगा राखण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर कसा करावा आणि त्याचे कोणते फायदे मिळू शकतात, जाणून घेऊया.

कोंड्याच्या समस्येपासून सुटका

हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे टाळूचा कोरडेपणा वाढतो. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या जाणवू शकते. अशावेळी एलोवेरा जेलचा वापर करता येतो. आंघोळीच्या साधारण अर्धा तास आधी कोरफडीचे जेल टाळूवर लावा. बोटांच्या मदतीने हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे टाळूला ओलावा मिळण्यास मदत होऊ शकते.

केस होतील रेशमी आणि मुलायम

कंडिशनर वापरूनही केस मुलायम होत नसतील तर कोरफडीच्या जेलचा वापर करून पाहू शकता. केसांना शॅम्पू केल्यानंतर एलोवेरा जेल लावा आणि काही वेळाने केस स्वच्छ धुवा. कोरफडीमुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. यामुळे केस अधिक मऊ, रेशमी आणि चमकदार दिसू शकतात.

केसगळतीची समस्या कमी करण्यास मदत

शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास त्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावरही होतो. केसांना पुरेसे पोषण न मिळाल्यास ते कमकुवत होऊन गळू लागतात. अशावेळी केसांची योग्य निगा राखणे महत्त्वाचे आहे. यासाठी कोरफडीचा हेअर मास्क आठवड्यातून दोन वेळा लावू शकता. यामुळे केसांची काळजी घेण्यास आणि त्यांना ओलावा मिळण्यास मदत होऊ शकते.

टाळूची खाज कमी करण्यासाठी उपयुक्त

टाळू कोरडी पडल्यामुळे खाज येण्याचा त्रास होत असेल तर कोरफडीच्या जेलचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात एलोवेरा जेल घ्या. त्यामध्ये एका लिंबाचा रस आणि थोडे खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण टाळूवर लावून १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. या मिश्रणामुळे टाळूला ओलावा मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र, लिंबाच्या रसामुळे जळजळ होऊ शकते, त्यामुळे संवेदनशील टाळू असल्यास हा उपाय टाळावा.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण