AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरुवारी १९ नोव्हेंबरला मुंबई विमानतळावर फ्लाईट ऑपरेशन ठप्प होणार, सहा तास बंद राहणार दोन्ही रनवे, काय आहे अपडेट..

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या दोन्ही धावपट्ट्यांची डागडुजी उद्या सकाळ ते दुपारपर्यंत होणार आहे. त्यामुळे विमानांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

गुरुवारी १९ नोव्हेंबरला मुंबई विमानतळावर फ्लाईट ऑपरेशन ठप्प होणार, सहा तास बंद राहणार दोन्ही रनवे, काय आहे अपडेट..
MUMBAI AIRPORT CLOSED
| Updated on: Nov 18, 2026 | 10:49 PM
Share

Mumbai Airport News: मुंबई विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दुष्टीने महत्वाची बातमी आहे. उद्या गुरुवार १९ नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे दोन्ही रनवे सहा तासांसाठी बंद रहाणार आहेत. या दरम्यान विमानाचे संचलन संपूर्णपणे बंद असणार आहे. ज्या प्रवाशांच्या फ्लाईटची वेळ या वेळेच्या आसपास असणार आहे. त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही रनवे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान बंद असणार आहेत. या दरम्यान विमानांची लँडिंग आणि टेकऑफ होणार नाही. एअरपोर्टवर लँड होणाऱ्या आणि येथून टेकऑफ घेणाऱ्या फ्लाईट्सच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होऊ शकतो.

दोन्ही रनवेच्या देखभाल दुरुस्तीचे काम

एअरपोर्टच्या दोन्ही क्रॉस रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 वार्षिक देखभालीसाठी बंद केले जाणार आहे. हे काम मान्सूननंतर दरवर्षी होणाऱ्या मेटेनन्स प्रक्रियेचा एक भाग आहे. पावसाळ्यात रनवेवर पाणी आणि हवामानाचा परिणाम होतो. त्यामुळे अनेक तांत्रिक दुरुस्ती आणि देखभालीची गरज असते. या दरम्यान दोन्ही रनवेचा पृष्ठभागाची तपासणी आणि डागडुजी केली जाते. यासोबत रनवेवरील लायटिंग, मार्किंग ( खुणा ) आणि इतर तांत्रिक व्यवस्थांची दुरुस्ती केली जाते. या कामाचा हेतू विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ सुरक्षितपणे व्हावे हा असतो.

एअरलाईन्स कंपन्या आणि संबंधित विभागांसोबत समन्वय

एअरपोर्ट प्रशासनाने धावपट्टींच्या देखभालीच्या कामाला पूर्ण करण्यासाठी एअरलाईन्स कंपन्या आणि संबंधित विभागांसोबत समन्वय केला आहे. प्रयत्न आहे की रनवे बंद असल्याच्या काळात उड्डाणांना होणारा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी एअर लाईन्स कंपन्यांना आगाऊच माहिती देण्यात आली होती. त्यामुळे विमानांचे वेळापत्रक मागे पुढे करण्यात आले आहे.

एअरपोर्टवर जाण्याआधी फ्लाईटचे स्टेटस जरुर चेक करावे

१९ नोव्हेंबर रोजी मुंबईहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विशेष सावधानता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रवाशांनी एअरपोर्टसाठी घरातून निघताना त्यांच्या संबंधित एअरलाईन कंपनीकडून फ्लाईटची वेळ आणि सध्याची स्थिती याची माहिती अवश्य घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाची आखणी करावी. खासकरुन सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या फ्लाईटमध्ये संभाव्य बदल, उशीर वा रिशेड्युलिंगची माहिती आधी घ्यायला हवी. त्यामुळे एअरपोर्टवर पोहचल्यानंतर निराशा होणार नाही.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण