tv9 Marathi Special Report | दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांसोबत दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींसोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषयांवरही चर्चा झाली, असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर शिंदे यांनी खासदारांसोबतही बैठक घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांसोबत दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींसोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषयांवरही चर्चा झाली, असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर शिंदे यांनी खासदारांसोबतही बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना काही सक्तीच्या सूचनाही दिल्या. तुम्ही दिल्लीमध्ये असलात तरी माझं लक्ष तुमच्यावर आहे. प्रत्येकाच्या कामाचे रिपोर्ट कार्ड तयार होत आहे. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, अशा स्पष्ट सूचनाच शिंदे यांनी खासदारांना दिल्या आहेत. मंत्रिपदाची आस बाळगणाऱ्या खासदारांना शिंदेंनी कामावर लक्ष केंद्रित करण्याचाही सल्ला दिला. दरम्यान, केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चाही जोर धरून आहेत. याच पार्श्वभूमीवर, सुनील तटकरे यांनीही भाजपने राष्ट्रवादीला दोन केंद्रीय मंत्रीपदांचा आश्वासन दिलं आहे, अशी आठवण करून दिली.
Published on: Mar 18, 2026 12:34 PM
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...

