Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
बारामतीतील कऱ्हा आणि निरा नदीच्या संगमावर अजित पवारांच्या अस्थींचे विसर्जन पवार कुटुंबाने केले. पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. अजित पवारांचे अकाली निधन महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. राज्यामध्ये शोककळा पसरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन आज बारामती येथे कऱ्हा आणि निरा नद्यांच्या संगमावर करण्यात आले. काटेवाडी गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या पवित्र स्थळी पवार कुटुंबीय अस्थी विसर्जनासाठी उपस्थित होते. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास बापू पवार आणि योगेंद्र पवार हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी हा विधी पार पडला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पवार कुटुंबासाठी हा अत्यंत दुःखाचा क्षण असून, त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबाचा एक मोठा आधार हरवला असल्याची भावना व्यक्त होत आहे. बारामतीसह राज्यभरातून अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट

