AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका

Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका

| Updated on: Jul 23, 2026 | 12:33 PM
Share

मुंबईत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

मुंबईत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

राज ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून देशभरात विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न होत असून विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. या घटनांचे पडसाद देशभरासह महाराष्ट्रातही उमटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

NEET पेपरफुटी प्रकरणावर बोलताना राज ठाकरे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, यापूर्वी विरोधी पक्षात असताना भाजपने विविध घटनांमध्ये मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. त्यामुळे या प्रकरणातही नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधितांनी भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी दावा केला की, NEET परीक्षेतील गैरप्रकार हा पहिल्यांदाच घडलेला प्रकार नसून यापूर्वीही पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. केंद्रीकृत परीक्षा पद्धतीबाबत आपण पूर्वीच आक्षेप घेतला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फास्ट-ट्रॅक न्यायालयांची घोषणा केल्याचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, केवळ घोषणा करून प्रश्न सुटणार नाही. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या असत्या, तर आंदोलन इतके तीव्र झाले नसते. सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा होता, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि मणिपूरमधील घटनांचाही उल्लेख करत सरकारवर संवाद टाळल्याचा आरोप केला. देशातील तरुणांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यवस्थेविरोधात असंतोष वाढत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले.

 

Published on: Jul 23, 2026 12:33 PM

Follow Us
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..