AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेव चित्रपट, ज्याला इंटरव्हलनंतर पाहण्यासाठी थिएटरमध्ये व्हायची प्रचंड गर्दी, कारण काय?

90 च्या दशकातील एकमेव चित्रपट, ज्याला पाहण्यासाठी लोक इंटरव्हलनंतर थिएटरमध्ये करायचे गर्दी. त्या अभिनेत्याची एन्ट्री होताच थिएटरमध्ये वाजायच्या शिट्या आणि टाळ्या. कोणता आहे तो चित्रपट?

एकमेव चित्रपट, ज्याला इंटरव्हलनंतर पाहण्यासाठी थिएटरमध्ये व्हायची प्रचंड गर्दी, कारण काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 23, 2026 | 2:59 PM
Share

सध्याच्या डिजिटल युगात कोणत्याही चित्रपटातील दमदार सीन किंवा एखाद्या स्टारची एंट्री काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होते. मात्र, 90 च्या दशकात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात आपल्या आवडत्या कलाकाराची मोठ्या पडद्यावरील एन्ट्री अनुभवण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत असत. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दामिनी’ या चित्रपट याचेच एक उदाहरण आहे. विशेष म्हणजे अनेक चित्रपटगृहांमध्ये इंटरव्हलनंतरही तिकीट खिडक्यांवर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. यामागचे प्रमुख कारण होते सनी देओलची दमदार एन्ट्री.

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘दामिनी’ हा त्या काळातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला. चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री, ऋषी कपूर आणि अमरीश पुरी यांसारखे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत होते. मात्र, सनी देओलची एन्ट्री चित्रपटाच्या इंटरव्हलनंतर होते.

तरीही प्रेक्षक त्यांची आतुरतेने वाट पाहत असत. माध्यमांतील माहितीनुसार, मुंबईतील बांद्रा टॉकीजमध्ये इंटरव्हलपर्यंत चित्रपटाचे बुकिंग सुरू असायचे. अनेक प्रेक्षक केवळ सनी देओलचा हा सीन पाहण्यासाठी इंटरव्हलनंतर चित्रपटगृहात पोहोचत असत. ते पडद्यावर दिसताच संपूर्ण थिएटर टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोषाने दणाणून जात असे.

काही मिनिटांची भूमिका, पण सर्वाधिक गाजलेला कलाकार

‘दामिनी’मध्ये सनी देओलने अॅडव्होकेट गोविंद ही भूमिका साकारली होती. ही भूमिका संपूर्ण चित्रपटात फार मोठी नव्हती. मात्र, पडद्यावर त्याने दिलेला प्रत्येक क्षण प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. विशेषतः न्यायालयातील त्याचे प्रभावी संवाद आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत.

त्याच्या दमदार अभिनयासाठी सनी देओलला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यामुळे ‘दामिनी’चा उल्लेख झाला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम सनी देओलचा चेहरा उभा राहतो.

तीन दशकांनंतरही आठवणी ताज्या

चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दशकांहून अधिक काळ लोटला असला, तरी ‘दामिनी’बाबत आजही अनेक किस्से चर्चेत आहेत. विशेषतः इंटरव्हलनंतर थिएटरमध्ये वाढणारी प्रेक्षकांची गर्दी, सनी देओलच्या एन्ट्रीवेळी होणारा जल्लोष आणि त्याच्या गाजलेल्या संवादांच्या आठवणी आजही प्रेक्षक आवर्जून सांगतात. ‘दामिनी’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील असा चित्रपट मानला जातो, ज्यामध्ये मर्यादित स्क्रीनटाइम असूनही सनी देओलने आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण चित्रपटावर ठसा उमटवला.

Follow Us
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! संभाजी ब्रिगेड आक्रमक
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! नवी मुंबईत संभाजी ब्रिगेड आक्रमक; नेमकं काय घडलं?
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय...
MPSC Paper Leaked | संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची...
Sanjay Raut | नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची तुफान चर्चा
अखेर ठरलं! मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही..
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही आलं समोर
नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
Mumbai Modi Express | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा! नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... दीपकेंचा सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत...
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत नेमकं काय सांगितलं?
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
BRICS परिषदेसाठी दिल्लीत मोठ्या हालचाली, पुतिन जिनपिंग आणि PM मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...