AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, Semi Final : अक्षर पटेलने घेतलेला झेल पाहिलात का? उलटा धावत गेला आणि… Video

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने जबरदस्त खेळी केली. नाणेफेकीचा कौल गमावला पण फलंदाजी सर्वकाही वसूल केलं. भारताने 253 धावा केल्या. त्यानंतर क्षेत्ररक्षणातही भारताने कमाल केली. अक्षर पटेलने घेतलेला झेल पाहून तुम्हीही तसंच म्हणाल..

IND vs ENG, Semi Final : अक्षर पटेलने घेतलेला झेल पाहिलात का? उलटा धावत गेला आणि... Video
अक्षर पटेलने घेतलेला झेल पाहिलात का? उलटा धावत गेला आणि... VideoImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 05, 2026 | 9:42 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा सामना इंग्लंडशी झाला. या सामन्यातील पहिल्या डावापासून भारताचा वरचष्मा दिसला. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 253 धावा केल्या. तसेच विजयासाठी 254 धावांचं आव्हान ठेवलं. भारताने विजयासाठी दिलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीला दोन धक्के बसले. संघाच्या 13 धावा असताना फिलिप सॉल्ट बाद झाला आणि 38 धावा असताना कर्णधार हॅरी ब्रूक तंबूत परतला. पण हॅरी ब्रूकची विकेट काही सहजासहजी मिळाली. या विकेटसाठी अक्षर पटेलची मेहनत कामी आली. कारण हॅरी ब्रूकने मारलेला चेंडू खूपच वर चढला होता. हॅरी ब्रूकला तंबूत पाठवण्यासाठी अक्षरने जीवाची बाजी लावली असं म्हणायला हरकत नाही.

हॅरी ब्रूक आणि जोस बटलर ही जोडी फोडण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने पावरप्लेचं पाचवं षटक जसप्रीत बुमराहकडे सोपवलं. या षटकाचा पहिलाच चेंडू जसप्रीत बुमराहने स्लो टाकला. त्यामुळे हॅरी ब्रूक फटका मारताना चुकला आणि चेंडू खूपच वर चढला. हा चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षणाला असलेल्या अक्षरपासून लांब होता. पण अक्षर मागे धावत गेला. यावेळी त्याची नजर चेंडूवर कायम होती. चेंडू जसा खाली पडणार तितक्यात त्याने उडी घेतली आणि झेल पकडला. यामुळे हॅरी ब्रूकचा डाव 7 धावांवर आटोपला. अक्षर पटेलच्या या झेलची चर्चा आता होत आहे. कारण जिथे उभा होता तेथून 24 मीटर लांब धावत हा झेल पकडला. 5.44 सेकंदात त्याने हे अंतर कापलं आणि झेल पकडला.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका बाजूने न्यूझीलंडने धडक मारली आहे. तर दुसरा कोण हे भारत इंग्लंड सामन्यातून ठरणार आहे. भारताने विशालकाय स्कोअर केल्याने इंग्लंडला खूपच घाम गाळावा लागणार आहे. दुसरीकडे, धडाधड विकेट पडल्या तर हा स्कोअर गाठणं कठीण होईल. पावर प्लेमध्ये इंग्लंडने 3 विकेट गमावल्याने आता इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे.

Follow Us
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात