AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी टीम इंडियाची साथ का सोडली? बीसीसीआय निशाण्यावर

T20 World Cup 2026, Semi Final: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात तीन सामन्यानंतर जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी तीन दिग्गज खेळाडूंनी टीम इंडियाची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी टीम इंडियाची साथ का सोडली? बीसीसीआय निशाण्यावर
सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी टीम इंडियाची साथ का सोडली?Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 03, 2026 | 3:37 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. 5 मार्च रोजी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हा हायव्होल्टेज सामना असेल यात काही शंका नाही. सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना खेळून टीम इंडिया कोलकात्याहून मुंबईला आली आहे. पण भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे टीम इंडियाची साथ सोडून घरी गेले. मुंबई एअरपोर्टवरून एक व्हिडीओ समोर आला आहे. यात सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे वगळून इतर खेळाडू बसमधून हॉटेलवर गेले. तर हे तिघे आपआपल्या खासगी गाडीतून घरी गेले. हे तिन्ही खेळाडू मुंबईत राहतात. त्यामुळे हॉटेलऐवजी त्यांनी घरी जाणं पसंत केले. पण आता त्यांच्या घरी जाण्यावर क्रीडाप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे.

उपांत्य फेरीचा सामना दिग्गज इंग्लंड संघाविरुद्ध होत आहे. असं असताना सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे टीम इंडियाची साथ सोडून का गेले? त्यांचं घर मुंबईत असलं तरी ते हॉटेलमध्ये इतर खेळाडूंसोबत राहू शकले असते. अखेर या तिघांना बीसीसीआयने परवानगी का दिली? असे प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. जर उपांत्य फेरीचं गणित चुकलं तर मात्र हे प्रकरण पुढे येईल. कारण भारतीय संघ जेतेपदापासून फक्त 2 विजय दूर आहे. अशा स्थितीत टीम इंडियाने एकत्र राहणं आवश्यक आहे. खेळाडूंचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी आणखी वाढते.

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे दिग्गज खेळाडू आहेत. या दोघांनी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत काही सामने जिंकवले आहेत. पण त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण नाही. हार्दिक पांड्या गोलंदाज म्हणून खूपच महागडा ठरला आहे. त्याने सर्वाधिक षटकार दिले आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवही फार काही ग्रेट करू शकलेला नाही. अमेरिकेविरुद्ध नाबाद 84 धावांची खेळी केली. त्यानंतर एकही अर्धशतक ठोकलेलं नाही. त्याने तीन वेळा 30हून अधिक धावा केल्या. पण मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. उलट मोक्याच्या क्षणी विकेट टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?