AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?

सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 07, 2026 | 12:37 PM
Share

वाशिम रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी शासकीय कार्यालयात रील शूट केल्याने प्रशासकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. शासकीय पदाचा आणि कार्यालयाचा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वापर करणे नियमांचे उल्लंघन असून, नियमभंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी शासकीय कार्यालयातच रील (Reel) शूट केल्याने प्रशासकीय वर्तुळात तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. शासकीय नियमांना पायदळी तुडवून तहसीलदार कार्यालयातच हे रील शूट करण्यात आले आहे.

शासकीय पदाचा आणि कार्यालयाच्या मालमत्तेचा वापर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी किंवा मनोरंजनासाठी करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, प्रतीक्षा तेजनकर यांनी केलेल्या या कृत्यामुळे या नियमांचे सरळसरळ उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या कृतीमुळे प्रशासकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या अधिकाऱ्यावर तातडीने शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शासकीय कार्यालयाचे पावित्र्य आणि नियमांचे पालन महत्त्वाचे असून, अशा घटनांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होते, असे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य कारवाई करणे आवश्यक आहे.

Published on: Sep 07, 2026 12:37 PM

Follow Us