Sanjay Raut Press | सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला; मोदींबाबतही केलं मोठ विधान
आखाती देशातील युद्धाच संपूर्ण जगावर परिणाम होत असून भारतातही याचा लोकांच्या आयुष्यावर परिणाम होताना दिसत आहे. युद्धामुळे निर्यात प्रभावित झाली असून, अनेक शेतकऱ्यांचा माल देशात अडकून पडला आहे, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गॅस टंचाईमुळे लोकांना सिलेंडरसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
आखाती देशातील युद्धाच संपूर्ण जगावर परिणाम होत असून भारतातही याचा लोकांच्या आयुष्यावर परिणाम होताना दिसत आहे. युद्धामुळे निर्यात प्रभावित झाली असून, अनेक शेतकऱ्यांचा माल देशात अडकून पडला आहे, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गॅस टंचाईमुळे लोकांना सिलेंडरसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही हॉटेल मालकांना चुलीवर काम करावे लागत आहे तर काही हॉटेल बंद झाले आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ही परिस्थिती दिसत आहे. या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “माझ्या घरात हीच परिस्थिती आहे, दोन दिवसांपासून माझ्या पत्नीला सिलेंडर मिळत नाही. महानगर गॅस येत आहे पण सिलेंडर मिळत नाही. सकाळपासून 60–70 लोक मला भेटायला आले, सर्वांनी सिलेंडर कुठून मिळेल असा प्रश्न विचारला.” त्यांनी राजधानी दिल्लीतील “नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब” या घोषणेचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्तर अपेक्षित असल्याचे म्हटले. राऊतांनी सरकारवर आरोप केला की, देशभरात सिलेंडरसाठी लागलेल्या रांगा लोकांच्या त्रासाचा कारण आहेत. नोटबंदीच्या काळात रांगेत लोकांचा जीव गेल्याचे आठवण त्यांनी करून दिली. या रांगेतही असे काही घडू शकते. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील अपयशामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

