NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची घडामोड समोर येत असून, पक्षाच्या नेतृत्वावरूनच विलीनीकरणाची प्रक्रिया सध्या रखडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नेतृत्वाची जबाबदारी कोणत्या गटाकडे राहणार, यावर अद्याप एकमत न झाल्याने चर्चेला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत महत्त्वाची घडामोड समोर येत असून, पक्षाच्या नेतृत्वावरूनच विलिनीकरणाची प्रक्रिया सध्या रखडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नेतृत्वाची जबाबदारी कोणत्या गटाकडे राहणार, यावर अद्याप एकमत न झाल्याने चर्चेला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षांतर्गत स्तरावर चर्चा सुरू असून, दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या चर्चा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, संभाव्य विलिनीकरणाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत किंवा या चर्चांबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार समोर येणाऱ्या या घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 24, 2026 10:39 AM
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...

