AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...

BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा…

| Updated on: Oct 30, 2026 | 12:37 PM
Share

विधान परिषदेतील अपयशानंतर भाजप आणि शिवसेनेत वाद विकोपाला गेला आहे. प्रवीण दरेकरांनी उघडपणे सांगितले की, महायुतीतील काही घटक विरोधात काम करत आहेत. "झारीतील शुक्राचार्य" रोखले नाहीत तर भाजप महायुतीबाबत गंभीरपणे विचार करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

विधान परिषदेतील अपयशानंतर महाराष्ट्र राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्यातील महायुतीत वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. भाजपने शिवसेनेला थेट महायुतीवरून धमकीवजा इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुती टिकवायची असेल तर “झारीतील शुक्राचार्यांवर” कारवाई करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात बोलताना नवनाथ बन यांनी हा थेट इशारा दिला होता. आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे वक्तव्यही चर्चेत आले आहे, ज्यात त्यांनी उघडपणे मान्य केले आहे की, महायुतीच्या विरोधामध्ये काम केले जात आहे. अशा घटकांवर कारवाई होणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दरेकर यांनी स्पष्ट केले की, जर महायुती टिकवायची असेल तर अशा पद्धतीचे जे झारीतील शुक्राचार्य आहेत, त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, महायुतीत राहूनही महायुतीच्या विरोधात भूमिका घेणे कोणालाही परवडणार नाही. एकत्रित राहून जर टीका करणार असाल, तर भाजपही त्याच पद्धतीने विचार करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. त्यांनी शेखचिल्लीच्या कथेचे उदाहरण देत, आपलीच फांदी तोडून स्वतःचाच कडेलोट करण्यासारखे हे असल्याचे म्हटले आहे.

 

Published on: Oct 30, 2026 12:37 PM

Follow Us