Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आंदोलन करण्यात आले. मात्र, शिंदे गटाच्या आंदोलनात ठाण्यातील नगरसेवकांनी दांडी मारली. "मीनाक्षी शिंदेंसाठी नाही, एकनाथ शिंदेंसाठी येऊ" अशी भूमिका नगरसेवकांनी घेतल्याने मीनाक्षी शिंदेंवरील नाराजी उघड झाली आहे. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही गटांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलने केली. मात्र, या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ठाण्यात धक्का बसल्याचे समोर आले आहे. कालच्या आंदोलनामध्ये ठाण्यातल्या शिंदेंच्या शिवसेनेच्याच नगरसेवकांनी दांडी मारल्याची माहिती मिळाली आहे.
या आंदोलनात सहभागी झालेले अनेक नगरसेवक कल्याण-डोंबिवली भागातील होते, तर ठाण्यातील स्थानिक नगरसेवकांनी यापासून दूर राहणे पसंत केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “एकनाथ शिंदेंसाठी येऊ, मीनाक्षी शिंदेंसाठी नाही” अशी भूमिका अनेक नगरसेवकांनी घेतली होती. यामुळे नगरसेवकांमध्ये मीनाक्षी शिंदेंबाबत असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आयोजित केलेल्या या आंदोलनात ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेमुळे आता एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Published on: Oct 30, 2026 11:55 AM
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान

