Rupali Chakankar | बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणाबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि कायदेशीर हक्कांच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणाबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि कायदेशीर हक्कांच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोगाने तातडीने कारवाई सुरू केली असून 26 फेब्रुवारी रोजी बदलापूर नगरपरिषदेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्त्री बीज तस्करीच्या प्रकारांवर मुळापासून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मालकी असलेल्या आयव्हीएफ सेंटरला नाशिकमध्येच परवानगी असताना ते बेकायदेशीरपणे ठाण्यात चालवले जात असल्याचे समोर आले. या केंद्राशी संबंधित असलेले डॉक्टर अमोल पाटील यांना 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड झाल्या असून डोनर महिलांची बनावट आधार कार्डे तयार करून त्यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये एजंट, बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर चालवणारी टीम तसेच औषध पुरवठा करणाऱ्या काही लोकांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. या सर्वांवर कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

