Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर संविधानाचा अनादर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मूलभूत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि पंतप्रधान पदाला संविधानापेक्षा मोठे मानले. ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे त्यांनी नागरिकांचे न्यायालयीन हक्कांवर गदा आणली, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर भारतीय संविधानाचा अनादर केल्याचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूलभूत हक्कांवर गदा आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने संविधानात बदल करून सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांवर निर्णय घेण्यापासून रोखले, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीसांच्या मते, बाबासाहेब आंबेडकरांनी टाटा, बिर्ला असो किंवा गल्लीतील सामान्य माणूस, सर्वांना समान अधिकार दिले होते. मात्र, काँग्रेसने पंतप्रधान पदाला संविधानापेक्षा वरचढ ठरवण्याचे काम केले. १९७६ साली ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे काँग्रेसने मूलभूत अधिकार गोठवले आणि नागरिकांना सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार काढून घेतला, असा दावा फडणवीसांनी केला.
डॉ. आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकाला जगण्याचा, रोजगाराचा, धर्माचा आणि अभिव्यक्तीचा अधिकार दिला, तसेच या हक्कांचे हनन झाल्यास थेट न्यायालयामध्ये जाण्याची मुभा दिली होती. मात्र, काँग्रेसने हेच अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने १९७७ मध्ये पुन्हा संविधानात दुरुस्ती करून हे अधिकार सामान्य माणसाला बहाल केले, असे फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेसचे हे मनसुबे जुने असून ते संविधान विरोधी आहेत, असा हल्लाबोल फडणवीसांनी यावेळी केला.
Published on: Nov 02, 2026 06:13 PM
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...

