AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70 वर्षाच्या मैत्रीचा रशियाला विसर, भारतासाठी रशिया उभा नाहीच, मोठा दणका, निर्णय घेत..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. गॅस आणि तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यानच रशियाच्या तेलाची मागणी वाढली आहे. मात्र, यादरम्यान रशियाकडून भारताला मोठा धक्का देण्यात आला.

70 वर्षाच्या मैत्रीचा रशियाला विसर, भारतासाठी रशिया उभा नाहीच, मोठा दणका, निर्णय घेत..
Russia India
| Updated on: Mar 15, 2026 | 9:04 AM
Share

इराण आणि अमेरिकेत भयंकर स्थिती आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. जे आखाती देश अगोदर सुरक्षित वाटत त्याठिकाणी मोठे हल्ले होत आहेत. होर्मुज खाडी इराणकडून बंद ठेवण्यात आले. ज्या देशांच्या जहाजांना परवानगी नाही, असे जहाज जात असतील तर थेट पेटवून दिले जात आहेत. या युद्धाला 15 दिवस झाले पण युद्ध काही थांबत नाही. यासोबतच इराणकडून मोठे संकेत देण्यात आले. काही महिने काही वर्षही युद्ध सुरू राहू शकते, असे इराणकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या युद्धात इतर देश संकट झाले. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. 200 प्रति बॅरल तेलाचा भाव होईल, असेही इराणकडून सांगण्यात आले. कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याकरिता अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, त्यांना अजिबात यश मिळत नाही. रशियाकडून जगातील देशांनी तेल खरेदी करावे, असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले.

सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत अनेक देशांच्या संपर्कात आहे. विशेष म्हणजे रशियाच्या संपर्कात आहे. मात्र, यादरम्यान रशियाने भारतासोबतची 70 वर्षांची मैत्री विसरून भारताला देखील बाजार भावाप्रमाणेच तेल खरेदी करावे लागेल असे सांगितले. भारत बाजारा भावाप्रमाणेच रशियाकडून तेल खरेदी करत आहे. यापूर्वी रशिया भारताला त्यांच्या तेलावर मोठी सूट देत. मात्र, आता रशियाची भारताबद्दलची भूमिका बदलल्याचे बघायला मिळत आहे.

जवळपास 50 टक्के अतिरिक्त पैसे भारताला मोजावे लागत आहे. रशियन तेलावरील जवळपास सर्वच सूट काढण्यात आली. या मुद्द्यावर रशियन सरकारशी चर्चा सुरू आहे. मात्र, रशिया आपल्या भूमिकेवर ठाम आहे. निर्णय रशियाकडून बदलला जात नाहीये. भारताने सातत्याने तणाव कमी करण्याचे आणि युद्ध संपण्याची भूमिका घेतली. भारतात इराण आणि अमेरिका युद्धामुळे एलपीसी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारतात थेट व्यावसायिक सिलेंडर वितरण बंद करण्यात आले.

यादरम्यानच्या काळात भारताने इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबत चर्चा केली. जेणेकरून ऊर्जा सुरक्षा आणि सुरक्षित सागरी वाहतूक यासह भारताच्या प्राधान्यांना अधोरेखित करता येईल. रशियाने अगोदरच भारताला दणका देत स्पष्ट केले की, भारताला पूर्वीप्रमाणे कच्च्या तेलामध्ये सूट मिळणार नाही. सध्याच्या घडीला रशियाच्या तेलाची जगभरात प्रचंड मागणी आहे. या युद्धात सर्वाधिक फायदा रशियाचाच होत आहे. पूर्वीप्रमाणे सूट मिळावी, याकरिता भारताकडून अजूनही रशियासोबत चर्चा सुरू आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल