अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
बीड नगरपरिषदेत सत्ताधारी गटातील नाराजीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता सत्तांतराचे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे. नगरपरिषदेतील काही सत्ताधारी नगरसेवक नाराज असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, अनेक वर्षांपासून राजकीय विरोधात असलेले योगेश क्षीरसागर आणि आमदार संदिप क्षीरसागर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे. भाजप नेते योगेश क्षीरसागर यांनी बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी, “बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे,” असे वक्तव्य केले.
यानंतर आमदार संदिप क्षीरसागर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी, “अशी वेळ आली तर आम्ही दोघे क्षीरसागर एकत्र बसण्यास तयार आहोत,” असे स्पष्ट केले. या वक्तव्यांमुळे बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
योगेश क्षीरसागर आणि संदिप क्षीरसागर एकत्र आल्यास नगरपरिषदेतील सत्तेचे गणित बदलू शकते. त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील सत्तेसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Published on: Aug 02, 2026 02:29 PM
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...