विकास कामांसाठी… देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
केंद्रात मनुष्यबळ विकास खातं बघा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवल्याचा दावा उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता.
केंद्रात मनुष्यबळ विकास खातं बघा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवल्याचा दावा उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता. सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून त्यांनी हे सांगितलं होतं त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी याच भाकितावर भर दिला होता. या सबंध प्रकरणावर बोलताना भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
बावनकुळे म्हणाले, फडणवीस केंद्रात जाण्याच्या वावड्यांवर लक्ष देऊ नका असे ते म्हणाले. विकसीत महाराष्ट्राचा संकल्प फडणवीस हेच पूर्ण करू शकतात. राऊतांच्या दाव्यावर महसूलमंत्र्यांनी असे उत्तर दिले. त्यांच्याकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही. पण फडणवीस साहेब राज्यातच राहाणार. त्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका असे ते म्हणाले. एकूणच महाराष्ट्रात विकास कामांसाठी देवेंद्र फडणवीसच योग्य आहेत असं बावनकुळे म्हणाले.
Published on: Aug 02, 2026 04:06 PM
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...

