AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: या पाच लोकांचा कधीच अपमान करू नका, आयुष्य उद्ध्वस्त होईल, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अशी काही माणसं असतात ज्यांचा कधीही अपमान करू नका.

Chanakya Niti: या पाच लोकांचा कधीच अपमान करू नका, आयुष्य उद्ध्वस्त होईल, चाणक्य काय सांगतात?
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 02, 2026 | 10:19 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बलाढ्य राजघराणं असलेल्या धनानंदाची सत्ता उलथून लावली आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केला. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात, ज्यांचा तुम्ही कधीही अपमान करू नका, कारण हे लोक तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. जोपर्यंत त्यांची कृपा तुमच्यावर आहे, तोपर्यंत तुमच्या आयुष्याचा गाडा सुरळीत सुरू राहतो, त्यामुळे अशा लोकांना कधीही दुखवू नका, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आई-वडील – चाणक्य म्हणतात या जगात तुमच्या आई-वडिलांइतकं तुमचा शुभचिंतक या जगात दुसरा कोणी असूच शकत नाही. जोपर्यंत तुमच्या डोक्यावर तुमच्या आई-वडिलांचा हात आहे, तोपर्यंत जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला अडवू शकत नाही, त्यामुळे आई-वडिलांचा कधीही अपमान करू नका.

गुरू – चाणक्य म्हणतात जर आई-वडिलांनंतर तुमच्या आयुष्यात कोणी सर्वात महत्त्वाची व्यक्ती असेल तर ती म्हणजे तुमची गुरू, या गुरूमुळेच तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वावलंबी बनता, तुम्हाला भविष्याची दिशा दाखवण्याचं काम तुमचा गुरु करतो, त्यामुळे गुरूचा कधीही अपमान करू नका.

संत – चाणक्य म्हणतात जे संत आहेत, ते तुम्हाला अध्यात्मिक समाधान देतात. तुम्ही कितीही पैसा कमवला आणि तुमचं मन शांत नसेल तर सर्व व्यर्थ आहे. संत तुम्हाला मनाच्या शांतींचा मार्ग सांगतात, त्यामुळे कधीही त्यांचा अपमान करू नका.

कष्टकरी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक कष्ट करतात, प्रामाणिक असतात, अशा लोकांचा देखील तुम्ही कधीही अपमान केला नाही पाहिजे.

वृद्ध व्यक्ती – चाणक्य म्हणतात तुमच्या घरात जे वृद्ध व्यक्ती असतात, त्यांचा अनुभव आणि ज्ञान तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त असतं, त्यामुळे अशा लोकांचा कधीही अपमान करू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले