AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिमला जाणं शक्य नाही? किचनमधील रोजची कामंच ठरतील मिनी वर्कआउट, करा हे सोपे व्यायाम

घरातील कामं आणि जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिलांना व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होत नाही. अशा महिलांना स्वयंपाक करतानाच काही सोपे व्यायाम करता येऊ शकतात. कोणते व्यायाम केल्याने शरीर सक्रिय आणि फिट राहण्यास मदत होईल, हे जाणून घ्या.

जिमला जाणं शक्य नाही? किचनमधील रोजची कामंच ठरतील मिनी वर्कआउट, करा हे सोपे व्यायाम
किचनमधील रोजची कामंच ठरतील मिनी वर्कआउटImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 30, 2026 | 11:27 AM
Share

घर आणि ऑफिसच्या दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महिलांना स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. वाढते वजन आणि दिवसभर एकाच जागी बसून काम केल्यामुळे शरीराची हालचालही कमी होते. अशा महिलांसाठी किचनमध्ये काम करतानाच काही सोपे व्यायाम करता येऊ शकतात. विशेष म्हणजे, यासाठी वेगळा वेळ काढण्याची किंवा जिममध्ये जाण्याची गरज नाही. स्वयंपाक करताना आणि किचनमधील रोजची कामं करताना या छोट्या अॅक्टिव्हिटी केल्यास शरीर सक्रिय ठेवण्यास मदत होईल.

भाजी चिरताना असे बसा

भाजी चिरताना नेहमी उभे राहण्याऐवजी सुरक्षित आणि आरामदायी पद्धतीने पद्मासन किंवा सुखासनात बसण्याचा पर्याय निवडा. यामुळे शरीराचा पोश्चर सुधारण्यास मदत होते. तसेच कंबर, नितंब आणि पायांची लवचिकता टिकवून ठेवण्यासही फायदा होतो.

जमिनीवरून वस्तू उचलताना करा हा व्यायाम

किचनमध्ये काम करताना अनेकदा जमिनीवर ठेवलेले डबे, भांडी किंवा इतर वस्तू उचलाव्या लागतात. अशावेळी कंबरेतून खाली वाकण्याऐवजी गुडघे वाकवून स्क्वॅटच्या स्थितीत खाली बसा आणि वस्तू उचला. यामुळे पाठीच्या कण्यावर येणारा ताण कमी होण्यास मदत होते. तसेच पाय आणि नितंबांच्या स्नायूंनाही व्यायाम मिळतो.

स्वयंपाक करताना करा ही एक्सरसाइज

भाजी शिजेपर्यंत किंवा पाणी उकळेपर्यंत वाट पाहताना अनेकदा आपण एकाच जागी उभे असतो. या वेळेचा उपयोग काफ रेज एक्सरसाइज करण्यासाठी करू शकता. यासाठी सरळ उभे राहून हळूहळू टाच जमिनीवरून वर उचला आणि पुन्हा खाली आणा. हा व्यायाम करताना गरज असल्यास किचनच्या ओट्याचा आधार घ्या. यामुळे पायांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते.

किचनची साफसफाई करताना करा हे काम

किचनची साफसफाई करताना केवळ काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित न करता प्रत्येक हालचालीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. साफसफाई करताना श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि घाई न करता काम करा. यामुळे मन शांत ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होते. अशा प्रकारे रोजच्या कामातून शारीरिक हालचालींसोबत मानसिक आरोग्याचीही काळजी घेता येते.

किचनमध्ये व्यायाम करण्याचे फायदे

• रोजच्या कामांमधून अतिरिक्त कॅलरी खर्च होण्यास मदत होऊ शकते. • दिवसभर शरीर सक्रिय आणि उत्साही राहते. • नियमित हालचालींमुळे स्नायू आणि सांधे मजबूत ठेवण्यास मदत होते. • शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यास फायदा होतो. • माइंडफुलनेसच्या सरावामुळे मन शांत राहण्यास मदत मिळू शकते.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला