अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना…
NEET पेपरफुटी प्रकरणी अभिजीत दीपके याने सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी अनेकांनी दीपकेला पाठिंबा दिला. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) मधील संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांचा कल अभिजीत दीपकेकडे झुकताना दिसला. संजय शिरसाटांनी अभिजीत दीपकेची भेट घेतली. यावर भाजपचे प्रवीण दरेकर आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेतली. त्यावरून भाजप नेते नाराज झाले आहेत. रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ‘एकनाथ शिंदेंनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या नेत्यांनी कसे वागावे हे एकनाथ शिंदेंनी ठरवले पाहिजे. महायुतीत काम करताना असे वर्तन करणे योग्य नाही,’ असे महसूलमंत्री म्हणाले. याच प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर त्यांच्या नेत्यांना समज दिली असेल, तर त्यांचे स्वगतच आहे. कारण महायुती भक्कम राहावी, याकडेच शिंदेंचा भर असतो.’
Published on: Aug 02, 2026 04:30 PM
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...