बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
पुण्यात अमित शाह यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर बॅनर शेअर करत राऊतांनी या मुद्द्यावरून टीका केली.
पुण्यात अमित शाह यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर बॅनर शेअर करत राऊतांनी या मुद्द्यावरून टीका केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाह यांच्या स्वागतासाठी महायुतीकडून पुण्यात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते.
यातील शिंदे सेनेकडून लावण्यात आलेला एक बॅनर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो नसल्याचे सांगत त्यांनी शिंदे सेनेवर टीका केली.
राऊतांनी पोस्टमध्ये म्हटले, “हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कोठे? सोडा, श्री आनंद दिघे सुद्धा गायब झाले! काल पुण्यात अमित शहा यांच्या स्वागताचे हे होर्डिंग्स आहेत! बहुधा मालकांना चालत नसावेत! हळू हळू ढोंग उघडे पडत आहे!”
Published on: Aug 02, 2026 12:35 PM
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..

