AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...

मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात…

| Updated on: Aug 02, 2026 | 5:42 PM
Share

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात धर्मांतर-विरोधी कायदा - 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026' (Maharashtra Freedom of Religion Act, 2026) आता राज्यात लागू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाला

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात धर्मांतर-विरोधी कायदा – ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ (Maharashtra Freedom of Religion Act, 2026) आता राज्यात लागू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाला आणि त्याच तारखेपासून तो अंमलात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार “आता राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये नवीन कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.” यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याविषयी काय म्हणाले?

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही कोर्टात याला चॅलेंज करणार आहोत. मुंबई हाय कोर्टात याला चॅलेंज करू. जुन्या काळात भांडण होतं होतं. एक वर्ग विष्णूला मानणारा होता दुसरा रामाला मानणारा होता. रामायण, महाभारत ज्यांनी काढलं त्यांच्या विरोधात याचिका दाखल झाली होती. कुठल्या देवाने कुठल्या देवा समोर झुकले पाहिजे यावरून याचिका दाखल झाली होती. बड्या मुश्किलीने ती याचिका दाबण्यात आली होती. नेमकं कुणी कुणासमोर झुकावे हा विषय होता.

Published on: Aug 02, 2026 05:42 PM

Follow Us