शिवसेना कुणाची हे तर… आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीत एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी मुख्य नेता म्हणून शिंदे यांची निवड योग्य ठरवली. पक्षातील हुकूमशाहीचा आणि आंतर-पक्षीय लोकशाहीच्या अभावाचा मुद्दा मांडत, केवळ कायदेमंडळातील बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे प्रतिपादन केले.
शिवसेना पक्षचिन्ह आणि नेतृत्वाच्या संदर्भातील सुनावणीदरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण युक्तिवाद सादर केले. नीरज किशन कौल यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून झालेली निवड पक्ष घटनेला आणि संविधानाला धरून असून ती शिवसैनिकांच्या मनातली होती, असे ठामपणे सांगितले. युक्तिवाद करताना, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आंतर-पक्षीय लोकशाहीच्या अभावावर आणि हुकूमशाहीवर लक्ष वेधले. पक्षाला केवळ एका विशिष्ट आडनावाच्या आधारावर चालवता येत नाही, तर तो लोकशाहीच्या तत्त्वांवर आधारित असावा लागतो, असेही कौल यांनी मांडले. महत्तवाचे म्हणजे या प्रकरणी शिंदे गटातील महिला नेत्या ज्योती वाघमारे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना कुणाची याबाबत विचारताच त्यांनी आजच्या सुनावणीबाबत माहिती दिली…
निवडणूक आयोगाने कायदेमंडळातील बहुमताच्या (Legislative Majority) आधारावर दिलेला निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट करताना, निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे शिवसैनिकांच्या मतांवर आधारित असतात हे अधोरेखित करण्यात आले. यामुळे पक्षाचे चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना मिळणे कसे योग्य आहे, हे वकिलांनी न्यायालयात सादर केले. उद्या पुढील सविस्तर युक्तिवाद सादर केला जाईल अशी अपेक्षा आहे.
Published on: Sep 16, 2026 06:58 PM
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...

