AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...

बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा…

| Updated on: Sep 16, 2026 | 5:52 PM
Share

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड-पाटोदा रस्ता मराठा आंदोलकांनी अडवला आहे. जरांगे पाटील सध्या उपचार घेत असले तरी चलो मुंबईचा नारा देत आंदोलक आक्रमक झाले आहेत. गणेशोत्सवाच्या धामधुमीतही आरक्षणासाठीचा लढा तीव्र होताना दिसतोय.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात तीव्र आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बीडमधील पाटोदा रस्ता मराठा आंदोलकांनी अडवला आहे. सध्याची ही थेट दृश्य आहेत, जिथे मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील उपोषणावर आहेत आणि त्यांनी मुंबईकडे येण्याचा निर्धार केला आहे. त्यांना महाराष्ट्रातून मराठा समाज बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उपोषणावर असलेले जरांगे पाटील यांना प्रवासादरम्यान त्रास जाणवल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मात्र असे असतानाही मराठा आंदोलकांचा उत्साह कायम आहे. बीड-पाटोदा रस्त्यावर आंदोलकांनी वाहनांवर चढून चलो मुंबईचा नारा दिला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एका बाजूला गणेशोत्सवाची धूम सुरू असताना, दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचे वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी राज्यभरातील आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली असून, त्यासाठी त्यांनी पोलिसांकडे परवानगीही मागितली होती.

Published on: Sep 16, 2026 05:52 PM

Follow Us