AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात उडाला भडका! इराणकडून खतरनाक संदेश, थेट सांगितले युद्ध कधी संपणार, आम्ही रक्त…

अमेरिका आणि इराण युद्ध एका वेगळ्या टप्प्यात पोहोचले आहे. अमेरिकेकडून थेट इतर देशांना मदत मागण्यात आली. काही मदतीला येतील, अशीही आशा अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आली. यादरम्यानच इराणकडून अत्यंत मोठा संदेश देण्यात आला.

जगात उडाला भडका! इराणकडून खतरनाक संदेश, थेट सांगितले युद्ध कधी संपणार, आम्ही रक्त...
Abdul Majid Hakim Elahi
| Updated on: Mar 15, 2026 | 8:21 AM
Share

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष कमी होत नाहीये. थेट मोठे हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता इराणकडून अत्यंत मोठी धमकी अमेरिकेला देण्यात आली. आम्ही आमचे रक्त देऊ पण जमीन अजिबातच नाही म्हणजे इराणकडून करो या मरोच्या लढाईचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे या युद्धात कुठेतरी अमेरिका मागे पडताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने अशा युद्धाचा विचारही केला नाही. इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्याचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी ANI सोबत बोलताना अमेरिकेसोबतच्या युद्धाबाबत म्हटले की, आज इराणी लोकांमध्ये एक राग दिसत आहे. आज लोक स्वत: म्हणत आहेत की, आम्ही देशासाठी बलिदान देण्यास तयार आहोत. ते स्पष्ट म्हणत आहे की, आम्ही रक्त देऊ पण जमिन नाही.

मुळात म्हणजे हे युद्ध नक्की किती दिवस चालेल हे सांगणे कठीण आहे. इराणने शेवटपर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे युद्ध कितीही वर्ष चालले तरीही चालेल, इराणला मोठ्या युद्धाचा अनुभव आहे. यापूर्वी इराण आणि इराकमध्ये तब्बल आठ वर्ष युद्ध सुरू होते इराणने खूप काही सहन केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा आहे. तेहरानकडून कोणत्याचे चर्चेचा प्रस्ताव अमेरिकेकडे ठेवण्यात आला नाही. पुढे त्यांनी म्हटले की, इराणला कोणत्याही चर्चेची अजिबात इच्छा नाही. कारण हे युद्ध अमेरिकेने केलेल्या कारवाईनंतर सुरू झाले. आम्ही या युद्धात अजिबातच झुकणार नसल्याचेही त्यांनी यादरम्यान बोलताना म्हटले. इराणला अगोदरपासूनच युद्ध नको होते.

आम्ही शेजारी देशांना विनंती केली होती की, युद्ध नको आपण चर्चा करू, पण ठीक आहे त्यांना युद्धच हवे होते तर युद्ध. इराणला इतरांना संकटात टाकून आनंद मिळत नाही पण स्वतंत्रता आणि सुरक्षा ठेवण्याकरिता त्यांची मजबूरी आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेकडून सांगण्यात आले होते की, युद्ध चार आठवडे सुरू राहिल. मात्र, सध्याची स्थिती बघता युद्ध काही महिने सुरू राहण्याचे मोठे संकेत आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल