AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-अमेरिका युद्ध संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी टेकले गुडघे, थेट मागितली मदत…

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने इतर देशांना मोठे आवाहन केले. युद्धात इराणसोबत अमेरिका कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. यादरम्यानच आता अमेरिकेकडून इतर देशांना थेट मदत मागण्यात आली. आज युद्धाला 15 दिवस होऊन गेले आहेत.

इराण-अमेरिका युद्ध संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी टेकले गुडघे, थेट मागितली मदत...
Donald Trump
| Updated on: Mar 15, 2026 | 7:42 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्धाला 15 दिवस पूर्ण झाली. मोठे हल्ले केले जात आहेत. हेच नाही तर जमिनीवरील हे युद्ध आता थेट समुद्रापर्यंत पोहोचले. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आल्याने अमेरिकेची मोठी नाचक्की झाली. अनेक देशात गॅस आणि तेल संपले असून जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. इस्त्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यापुरतेच युद्ध मर्यादित राहिले नसून अनेक देश संकटात आहेत. आखाती देशांमध्ये फळे आणि भाज्या शिल्लक नाहीत. अन्नाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. पाकिस्तानवर भिकेला लागण्याची वेळ आली असून ऐन रमजानच्या महिन्यातच सरकारी कर्मचाऱ्यांची 30 टक्के पगार कापली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणसोबतचा युद्धाचा निर्णय चुकल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी जहाजे पाठवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, इराणसोबत पंगा होर्मुजच्या खाडीत एकटी अमेरिका घेताना दिसत नाही

होर्मुजच्या खाडीच्या मुद्दात अमेरिकेने अनेक धमक्या इराणला दिल्या. मात्र, इराणकडून कोणत्याही प्रकारची भीक घालण्यात आली नाही. यानंतर थेट नाकीनऊ आल्यानंतर अमेरिकेकडून होर्मुजमध्ये युद्धनाैका पाठवण्याचे आवाहन केले. त्यांनी पूर्वी सांगितले होते की, अमेरिकन नौदल लवकरच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून टँकरना एस्कॉर्ट करण्यास सुरुवात करेल. मात्र, आता अमेरिका स्वत:च्या नाैदलाला सुरक्षित ठेऊन इतरांना त्यामध्ये अडकवताना दिसत आहे.

होर्मुज खाडी बंद असल्याने अमेरिकेलाही मोठा फटका बसत आहे. इतर देश त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. एकीकडे अमेरिका दावा करत आहे की, इराणची लष्करी ताकद संपली आहे. मात्र, दुसरीकडे होर्मुज खाडीच्या सुरक्षेसाठी इतर देशांची मदत मागितली जात आहे. इराणकडून अमेरिकेलाही होर्मुजच्या खाडीत धोका वाटत आहे. जपान, फ्रान्स, चीन, ब्रिटन, दक्षिण कोरिया हे देश होर्मुज खाडीत त्यांच्या युद्धनाैका पाठवतील अशी अपेक्षा असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

जर देशा देशांनी त्यांच्या युद्धनाैका किंवा जहाजे पाठवली तर होर्मुज खाडी पूर्णपणे सुरक्षित होईल आणि धोका निर्माण होणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता खरोखरच डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनानंतर हे देश त्यांच्या युद्धानाैका होर्मुज खाडीत पाठवणार का? हा प्रश्न उपस्थित होतो. चीन याबाबत नक्की काय भूमिका घेतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल